---Advertisement---

‘…आणि मला पुन्हा लय सापडली’, ऑस्ट्रेलियन शतकवीराची मोठी प्रतिक्रिया

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 6:28 PM
---Advertisement---

शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाचा ६६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथने या सामन्यांत शतक झळकावत सामनावीर पुरस्कार पटकावला. ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने फक्त ६६ चेंडूत १०५ धावांची वादळी खेळी केली.

सामन्यानंतर या खेळीबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला, “मी गेले काही दिवस माझ्या फलंदाजीत विविध प्रयोग करून पाहत होतो. पण सामन्याच्या तीन दिवस अगोदर मला लय सापडल्याचं जाणवलं. चेंडू बॅटच्या मध्यावर बसायला लागला, आणि माझा आत्मविश्वासही त्याने परत आला.”

डेविड वॉर्नर आणि ऍरॉन फिंचने दिलेल्या भक्कम सलामीने दडपणाशिवाय फलंदाजी करणे शक्य झाले, असे स्मिथ म्हणाला.

“मी नेहमीपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. खेळपट्टीदेखील फलंदाजांना मदत करत असल्याने मी काही प्रमाणात जोखीम पत्करून देखील फटके मारले. काही विशिष्ट गोलंदाजांना लक्ष्य करण्याची माझी योजना होती. ती यशस्वी ठरल्याने संघाच्या विजयात योगदान देऊ शकल्याचा मला आनंद आहे”, असेही तो पुढे म्हणाला.

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियातने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना २९ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐकावे ते नवलंच! मुलाला बाद दिले म्हणून एका पंचाने दिली दुसऱ्या पंचाला धमकी

‘विश्वचषक २०१९ मधील चुकांची पुनरावृत्ती करू नका’, टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतमची ‘गंभीर’ प्रतिक्रिया

अरेरे…! भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात अवघ्या ७ धावांनी हुकला हा मोठा विक्रम

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---