---Advertisement---

ऐकावे ते नवलंच! मुलाला बाद दिले म्हणून एका पंचाने दिली दुसऱ्या पंचाला धमकी

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 5:50 PM
---Advertisement---

सिडनी येथे शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान वनडे मालिकेला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयी सुरुवात केली. यादरम्यान, ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक सामन्यात अजब घटना घडली. ऑस्ट्रेलियाच्या एका अनुभवी पंचाने दुसऱ्या पंचाला धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोषी पंचावर कारवाई करून प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.

मैदानी पंचांना दिली गेली धमकी

एका स्थानिक सामन्यात ऑस्ट्रेलियातील प्रमुख पंच असलेल्या गेरार्ड अबूद यांचा मुलगा तेरा वर्षांखालील संघात खेळत होता. अबूद यांचा मुलगा सामन्यातील अखेरच्या चेंडूवर ९८ धावांवर धावबाद झाला. मुलाला बाद दिले म्हणून, अबूद यांनी मैदानावरील पंचांना धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, अबूद यांनी पंचांशी गैरवर्तन केल्याचे व धमकी दिल्याची तक्रार सेंट जॉर्ज डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली.

अबूद यांनी मान्य केली चूक

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या तपासात अबूद हे दोषी आढळून आले. अबूद यांनी गैरवर्तन व आचारसंहिता भंगाचे आरोप कबूल केले. मात्र, धमकी देण्याचा आरोप फेटाळून लावला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर कारवाई करत, त्यांना ५,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठावला. सोबतच, पुढील एका वर्षात २० नवोदित पंचांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले.

अबूद यांच्या मुलाच्या संघाला पराभव पत्करावा लागला

या वादग्रस्‍त प्रकरणानंतर ही अबूद यांचा मुलगा खेळत असलेल्या इनर वेस्ट हार्बर संघाला सेंट जॉर्ज डिस्ट्रिक असोसिएशन संघाकडून तीन गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाविरुद्ध स्टिव्ह स्मिथच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंदच भल्याभल्यांना ठरला वरचढ

धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट

“मनीष पांडे दुर्दैवी”, हार्दिकला संघात स्थान दिल्याबद्दल माजी दिग्गजाचे रोखठोक मत

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---