---Advertisement---

“मनीष पांडे दुर्दैवी”, हार्दिकला संघात स्थान दिल्याबद्दल माजी दिग्गजाचे रोखठोक मत

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 4:19 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) झाला. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. दुखापतीतून सावरलेला हार्दिक गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त नव्हता. या कारणामुळेच त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नव्हती. तज्ज्ञ फलंदाज मनीष पांडे संघाचा भाग असतानाही हार्दिकला फलंदाज म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते. या निर्णयामुळे चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं.

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूने मनीष पांडे उपलब्ध असतानाही हार्दिकला संघात दिल्याबद्दल रोखठोक मतं व्यक्त केलं आहे.

मनीष पांडे दुर्दैवी- मांजरेकर

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील ‘प्री मॅच’ शोमध्ये बोलताना माजी खेळाडू संजय मांजरेकर म्हणाले की, “हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाही, तर तो फक्त फलंदाज म्हणून खेळत आहे. हे जुगार खेळण्यासारखं आहे. आशा आहे की ही योजना यशस्वी होईल. जडेजाचे संघातील स्थान निश्चित होतं. मी तज्ज्ञ खेळाडूंना स्थान देऊन मजबूत संघ बनवण्यावर विश्वास ठेवतो. मनीष पांडे दुर्दैवी आहे कारण त्याच्या जागी हार्दिक पंड्याची तज्ज्ञ फलंदाज म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड झाली.”

गिल, शार्दूल ठाकूर यांना मिळाली नाही संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये उच्च दर्जाचे खेळाडू होते. मात्र, असे असूनही मनीष पांडे, शुबमन गिल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव यांसारखे उत्कृष्ट खेळाडू बाकावर बसले होते.

ऑस्ट्रेलियाने केल्या 374 धावा

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 बाद 374 अशी मोठी धावसंख्या उभारली आणि भारतासमोर अवघड आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच (114 धावा) आणि स्टीव्ह स्मिथ (105 धावा) यांनी शतक झळकावले.

भारताचा झाला पराभव

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने 50 षटकांत 8 बाद 308 धावा केल्या आणि 66 धावांनी संघाचा पराभव झाला. भारताकडून हार्दिक पंड्या (90 धावा )आणि शिखर धवन (74 धावा) यांनी अर्धशतक झळकावले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘विश्वचषक २०१९ मधील चुकांची पुनरावृत्ती करू नका’, टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतमची ‘गंभीर’ प्रतिक्रिया

अरेरे…! भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात अवघ्या ७ धावांनी हुकला हा मोठा विक्रम

एकाच सामन्यात दोन धक्के! आयसीसीने टीम इंडियावर ठोठावला मोठा दंड

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---