रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यासाठी रवाना होईल. ज्यासमध्ये संघाला कांगारूंविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ज्यापैकी पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर भारतीय संघाला पर्थमध्ये 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान इंट्रा स्क्वॉड सामना खेळायचा होता. ज्यामध्ये संघाचा सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला पोहोचलेल्या भारत अ संघाशी झाला असता. मात्र, आता यात बदल करण्यात आला असून इंट्रा स्क्वॉड मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करेल.
भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यासाठी या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोणताही देशांतर्गत संघ निवडला नाही. उलट संघांतर्गत सामना खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र आता तेही रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी, भारतीय संघ पर्थच्या विकेटवर सराव करेल. जेणेकरुन खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी स्वत:ची चांगली तयारी करू शकतील.
ऑस्ट्रेलियाच्या मागील 2 दौऱ्यांवर भारतीय संघाकडून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. ज्यामध्ये कांगारू संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्यात त्यांना यश आले. आता टीम इंडियाने तिसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकावी अशी आशा आहे. असे करण्यात संघ यशस्वी झाला तर नवा इतिहास नक्कीच लिहिला जाईल. मात्र, हे काम भारतीय संघासाठी इतके सोपे जाणार नाही.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचं पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
हेही वाचा-
IPL 2025; ‘अच्छे दिन आ गये’, मेगा लिलावापूर्वी या खेळाडूंची दिवाळी!
लाल कुर्ता, कपाळावर टिळा! महेंद्रसिंह धोनीनं पत्नी साक्षीसोबत अशाप्रकारे साजरी केली दिवाळी; पाहा VIDEO
भारतीय संघानं बाहेर केलेल्या गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियात जलवा, कांगारुंविरुद्ध 6 विकेट घेऊन जोरदार कमबॅक!