भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना जिंकला आहे.
आतापर्यत भारताने 14 पैकी 11 कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत ती मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला आहे. जर असेच आताच्या मालिकेत झाले तर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.
यामध्ये भारताला फक्त एकच अशी कसोटी मालिका गमवावी लागली ज्याचा पहिला सामना भारताने जिंकला होता. 2006-07मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना जिंकली होती. पण भारताला ही कसोटी मालिका गमवावी लागली होती.
हा योगायोग पहिल्यांदा 1968च्या वेळी झाला होता. भारतीय संघाने मंसूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध ड्युनेडिन हा पहिला कसोटी सामना पाच विकेट्सने जिंकला होता. ती मालिका भारताने 3-1 अशी जिंकली होती.
1986ला भारताने कपिल देवच्या नेतृत्वाखाली इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामना पाच विकेट्सने जिंकत तीन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात टाकली होती.
पाकिस्तानमध्ये 2004ला झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पाकिस्तानला 2-1 असे पराभूत केले होते. या मालिकेतील पहिल्या विजयी सामन्यात भारताकडून विरेंद्र सेहवागने त्रिशतक केल्याने हा सामना भारताने एक डाव आणि 52 धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्यावर तिसरा सामना जिंकत मालिकाही आपल्यानावे केली होती.
भारताने 2005मध्ये झिम्बाब्वेला 2-0 आणि बांगलादेशला 3-0 असे पराभूत करत मालिका जिंकली होती. या दोन्ही मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत विजयी ठरला होता.
2009ला न्यूझीलंड विरुद्धच्या तीन कसोटी मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला तर नंतरचे दोन सामने अनिर्णीत राहिले. यामुळे ही कसोटी मालिका भारताने 1-0 अशी जिंकली होती.
तसेच 2016मध्येही भारताने विंडीज विरुद्ध पहिला सामना जिंकल्यावर कसोटी मालिकाही जिंकली होती.
2017मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला कसोटीमध्ये 3-0 असे पराभूत केले होते. या मालिकेतील गॉल येथे झालेला कसोटी सामना भारताने 304 धावांनी जिंकला होता.
तसेच भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये जिंकण्याचा अनुभव आहे. यामुळे 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीला होणाऱ्या सामन्यात भारत जिंकू शकतो. 1977-78 आणि 1981 मध्ये मेलबर्नमध्ये झालेले सामने भारताने जिकंले आहेत. तर 1978ला सिडनीचा सामना जिंकला आहे.
भारतीय संघाचा हा योगायोग तसेच पहिल्या सामन्याच्या विजयाने खेळाडूंचा आनंद दुणावला आहे. यामुळे भारताने असाच पराक्रम सुरू ठेवला तर ते ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिका जिंकू शकतात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना उद्यापासून (14 डिसेंबर) सुरू होणार आहे. पर्थ येथील ऑप्टस या स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियन गोलंदाज नजरकैदेत, ड्रोनच्या सहाय्याने संघ व्यवस्थापनाने लढवली ही शक्कल
–तरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग
–आॅस्ट्रेलिया-भारत: जाणून घ्या, पर्थ कसोटीबद्दल सर्वकाही…