fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आॅस्ट्रेलिया-भारत: जाणून घ्या, पर्थ कसोटीबद्दल सर्वकाही…

पर्थ। उद्यापासून(14 डिसेंबर) भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना आॅप्टस स्टेडीयम पर्थ येथे खेळवला जाईल. पर्थमधील हे नवीन स्टेडीयम असून या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना आहे.

अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेला पहिला कसोटी सामना भारताने जिंकून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे या सामन्यातही ही विजयाची लय कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. पण त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाचा संघही या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

आज(13 डिसेंबर) भारतीय संघाने 13 जणांचा संघ घोषित केला आहे. पर्थ कसोटीतून आर अश्विन, रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ हे तिघेही दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.

त्यामुळे केएल राहुल आणि मुरली विजय ही जो़डी सलामीला खेळेल. तसेच मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे असतील आणि यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत संघात असणार आहे.

पण भारतासमोर रविंद्र जडेजा, हनुमा विहारी यांच्यापैकी कोणाला अंतिम 11 मध्ये संधी द्यायची हा प्रश्न आहे. तसेच रोहित ऐवजी विहारीला आणि अश्विन ऐवजी जडेजाला संधी देऊन तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे असा एक पर्यायही भारतीय संघव्यवस्थापनासमोर आहे.

पण पर्थमधील हिरवी खेळपट्टी पाहता भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि विहारी किंवा जडेजा मिश्रण खेळवण्याचा विचार करेल. वेगवान गोलंदाजांमध्ये भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार असे पर्याय आहेत.

तसेच पर्थची खेळपट्टीही वेगवान आणि उसळणारी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना त्याचा फायदा मिळणार आहे.

आॅस्ट्रेलियानेही अंतिम 11 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. त्यांनी अॅडलेड कसोटीतीलच संघ पर्थ कसोटीसाठी कायम केला आहे.

त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स या वेगवान त्रिकूटाचा सामना करण्याचे आव्हान आहे. तसेच नॅथन लियाननेही अॅडलेड कसोटीत चांगली गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले होते.

याचबरोबर आॅस्ट्रेलियाची फलंदाजी अॅडलेड कसोटीत जरी बहरली नसली तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. आॅस्ट्रेलियाचा शॉन मार्श हा मागील काही सामन्यात धावा करण्यासाठी झगडत होता. पण त्याने अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच ट्रेविस हेडनेही चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.

त्याचबरोबर आॅस्ट्रेलियालाही स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.

वातावरण-

पर्थमधील वातावरण उष्ण असणार असून साधारण 38 डिग्री सेल्सियस तापमान असणार आहे. तसेच पावसाचीही शक्यता आहे.

आमने – सामने

आत्तापर्यंत आॅस्ट्रेलिया – भारत संघात 95 कसोटी सामने झाले असून भारताने 27 सामन्यात विजय तर 41 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामना बरोबरी सुटला आहे आणि 26 सामने अनिर्णित राहिले आहेत.

तसेच या दोन संघात आॅस्ट्रेलियन भूमीत आत्तापर्यंत 45 कसोटी सामने झाले आहेत. यातील फक्त 6 सामन्यात  विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. तसेच आॅस्ट्रेलियाने 28 सामने जिंकले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.

त्याचबरोबर या दोन संघात वेस्टर्न क्रिकेट असोशियशन स्टेडियमवर 4 सामने झाले आहेत. यातील 3 सामने आॅस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तर 1 सामना भारताने जिंकला आहे. 2008 मध्ये अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारताने या मैदानात सामना जिंकला होता.

पर्थ कसोटीबद्दल सर्वकाही…

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत कधी होणार आहे दुसरा कसोटी सामना?

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना 14 डिसेंबर 2018 पासून सुरु होणार आहे.

कोठे होईल आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना?

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना आॅप्टस स्टेडियम, पर्थ येथे होणार आहे.

किती वाजता सुरु होईल आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना पाहता येणार आहे.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.

असे आहेत संघ-

13 जणांचा भारतीय संघ-

विराट कोहली(कर्णधार), के एल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हानुमा विहारी, रिषभ पंत(यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.

11 जणांचा आॅस्ट्रेलिया संघ- 

अॅरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन(कर्णधार, यष्टीरक्षक) पॅट कमिंन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लिआॅन.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: रियो ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना स्पर्धेबाहेर, इंग्लंड उपांत्यफेरीत दाखल

गेल्यावर्षी आयपीएलमध्ये १२ कोटी मिळालेल्या स्टार खेळाडूला केवळ दीड कोटीच मिळणार?

स्टार्कशी पंगा घेतलेल्या माजी दिग्गजाला स्टार्कच्या पत्नीने खडसावले

You might also like