Loading...

तरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग

सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाला अधिक आहे. भारताने पहिल्या सामन्यात 31 धावांनी विजय मिळवला असून ते चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहेत.

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले तर भारत जगातील सर्वोत्कृष्ठ संघ बनेल, असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बचरने व्यक्त केले आहे.

पहिल्या सामन्याच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन संघाला स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांची उणीव चांगलीच भासत आहे. तसेच त्यांचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कही फॉर्ममध्ये नाही.

भारतीय संघ 2012पासून घरच्या मैदानावर कसोटीमध्ये अपराजीत राहिला आहे. मात्र त्यांना बाहेरील मैदानात मालिका जिंकण्यात अपयश येत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात भारताला अनुक्रमे 2-1 आणि 4-1 असा पराभव स्विकारावा लागला आहे.

“भारतीय संघ घरच्या मैदानावर उत्तम खेळतो. कसोटीमध्ये अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारताला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात बाहेरील मैदानावर विजय मिळवून आपण उत्कृष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची संधी होती. मात्र त्यावेळी ते अपयशी ठरले. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाने भारतीय संघाच्या आशा उंचावल्या आहेत. ही विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करत ते ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतात”, असे बचर म्हणाला.

Loading...

उद्यापासून (14 डिसेंबर) पर्थ येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना पर्थच्या नवीन ऑप्टस या स्टेडियमवर खेळला जाणार असून याची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी लाभदायक आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Loading...

पर्थ कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा आॅस्ट्रेलिया संघ जाहीर

कर्णधार कोहलीला पर्थची हिरवी खेळपट्टी पाहून टेन्शन ऐवजी झाला आनंद…

सत्तेचाळीस वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…

You might also like
Loading...