भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जगभरातील चाहत्यांच्या नजरा या मालिकेकडे लागून राहिले आहेत. कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतील दोन सर्वोत्तम संघांमध्ये ही लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक करण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. भारताने ही मालिका जिंकल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत ते कायम राहील. प्रदीर्घ कालावधीनंतर मायदेशात मालिका विजयावर ऑस्ट्रेलियाचे लक्ष असेल. या मालिकेदरम्यान भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विनला मोठी कामगिरी करण्याची संधी असणार आहे.
भारताचा स्टार फिरकी गोलंदाज अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि तो गेल्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज होता. त्याने तीन कसोटीत 12 बळी घेतले. अश्विनला त्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती करायला आवडेल. अलीकडेच अश्विनने डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला मागे टाकले आहे.
या मालिकेदरम्यान अश्विनकडे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 200 बळी पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. जर तो पाच सामन्यांदरम्यान 6 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. तर तो डब्ल्यूटीसीमध्ये 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनेल. अश्विनच्या नावावर आता 194 विकेट्स आहेत. नॅथन लायनने 187 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान लायन आणि अश्विन 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी स्पर्धेदरम्यान खेळाच्या दीर्घ फॉर्मेटमध्ये आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत.
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्स
रवीचंद्रन अश्विन (भारत) 194
नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) 187
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) 175
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) 147
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) 134
हेही वाचा-
IPL 2025; “मोहम्मद शमीवर मोठी बोली लागणार नाही…’, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
इशांत शर्माला टीममध्ये स्थान, अचानक संघ जाहीर; आयपीएलपूर्वी या स्पर्धेत खेळणार!
आयपीएल लिलावापूर्वी हार्दिक पांड्या मैदानात, 8 वर्षांनंतर ही स्पर्धा खेळणार