भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर रोहित शर्मा आणि कंपनी पुढील महिन्यात बॉर्डर-गावस्कर स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्रस्थानाची तारीख जाहीर झाली आहे. टीम इंडिया 10 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ पुढील महिन्याच्या 10 तारखेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल. जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची दीर्घ कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
कांगारूंच्या भूमीवर पोहोचल्यानंतर भारताला 15 नोव्हेंबरला सराव सामना खेळायचा आहे. हा सामना 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान भारत अ विरुद्ध होणार आहे. यानंतर 22 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. यानंतर 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आणखी एक सराव सामना खेळवला जाईल.
Indian team will travel to Australia for the Border Gavaskar Trophy on November 10th. [Express Sports]
– All the best, India 🇮🇳 pic.twitter.com/DmMF24DNhw
— Johns. (@CricCrazyJohns) October 27, 2024
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्रमुख खेळाडूंव्यतिरिक्त काही नव्या चेहऱ्यांनाही संघात संधी देण्यात आली असून, त्यात हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळाली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या तिसऱ्या आवृत्तीचा विचार करता ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
राखीव खेळाडू: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
हेही वाचा-
विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळात, पदार्पण वर्ष देखील यापेक्षा चांगले!
काय करावं ते सुचेना! भारताच्या दिग्गज फलंदाजांनी चक्क ‘पार्ट टाईम क्रिकेटर’समोर गुडघे टेकले
कमबॅक असावा तर असा! 1188 दिवसांनी संधी मिळताच ठोकले झंझावाती शतक, 19 वर्षांची प्रतीक्षा संपली