---Advertisement---

रिंकू द फिनिशर! शेवटच्या चेंडूवर षटकार मारून ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

On: गुरूवार, नोव्हेंबर 23, 2023 10:51 PM
Rinku Singh
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना गुरुवारी (23 नोव्हेंबर) पाहायला मिळाली. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अप्रतिम खेळी केली, जी संघाच्या विजयात महत्वाची ठरली. रिंकू सिंग पुन्हा एकदा सध्याच्या भारतीय संघातील सर्वोत्तम फिनिशर ठरला. उभय संघांतील टी-20 मालिकेचा हा पहिला सामना भारताने 2 विकेट्सने जिंकला आणि विश्वचषकातील पराभवाच्या वेदना कही प्रमाणात कमी केल्या.

भारताला या सामन्यात विजयासाठी 209 धावा हव्या होत्या. रिंकू सिंग पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेत होता. त्याने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर एक धावा हव्या होत्या आणि रिंकूने षटकार मारून सामन्याचा शेवट केल्या. तत्पूर्वी सलामीवीर ऋतुराज गायकवाड () गोल्डन डकवर (एकही चेंडू न खेळता शून्य धावांवर) बाद झाला. यशस्वी जयस्वाल यानेही 21 धावा करून विकेट गमावली. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशन आणि चौथ्या क्रमांकवर खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव यांनी मोठी भागीदारी केली. ईशान 39 चेंडूत 58 धावांची खेली करू शकला. तर शतकाला 20 धावा कमी असताना सूर्यकुमारने विकेट गमावली. अवघ्या 42 चेंडूत सूर्यकुमारने 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावांची खेळी केली. तिलक वर्मा याने 12 धावांचे योगदान दिले.

उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली होती. सूर्यकुमार यादव याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर लगाम लावू शकले नाहीत. जोश इंग्लिस () याच्या शतकी खेळीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या 20 षटकात 3 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावा केल्या होत्या.

उभय संघांतील ही टी-20 मालिका पाच सामन्यांची आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा टी-20 सामना रविवारी (26 नोव्हेंबर) आयोजित केला जाणार आहे. (IND vs AUS India won the first T20 match against Australia)

महत्वाच्या बातम्या – 
एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत चार भारतीय खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
मोठी बातमी! वर्ल्डकप खराब गेल्यानंतर स्टोक्सची आयपीएलमधूम माघार, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---