भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पहिल्या सामन्यापूर्वी सर्व भारतीय खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांनीही या मालिकेसाठी आपापले संघ जाहीर केले आहेत. दरम्यान, सराव सत्रादरम्यान टीम इंडियाचे काही खेळाडू जखमी झाल्याची बातमी समोर आली होती. या खेळाडूंमध्ये शुबमन गिल, केएल राहुल आणि सरफराज खान यांचा समावेश होता. मात्र आता या तिघांपैकी एक खेळाडू तंदुरुस्त झाला असून तो पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून केएल राहुल आहे.
टीम इंडियाचे खेळाडू मॅच सिम्युलेशनमध्ये सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये भारतीय खेळाडू आपापसात सामने खेळत आहेत. यावेळी केएल राहुलच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे त्याला सामन्याच्या मध्येच बाहेर जावे लागले. राहुलच्या या दुखापतीने चाहत्यांची चिंता अचानक वाढवली होती. मात्र पुन्हा एकदा केएल राहुल आज 17 नोव्हेंबरला सरावासाठी मैदानात उतरला आहे. या मालिकेसाठी केएल राहुल टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. दुखापतीमुळे तो मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नसता तर टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले असते.
KL RAHUL BATTED MORE THAN ONE HOUR AT CENTER WICKET IN PERTH…!!!!
– KL Rahul faced Bumrah, Siraj & all the top bowlers in the nets and centre wickets at WACA in Perth. (RevSportz). pic.twitter.com/Ewzh2Cddpn
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 17, 2024
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या भारतात आहे. रोहित शर्मा 15 नोव्हेंबरच्या रात्री दुसऱ्यांदा पिता झाला. त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे यावेळी रोहित शर्मा त्याच्या कुटुंबासह उपस्थित आहे. त्यामुळे रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या जागी केएल राहुल टीम इंडियासाठी सलामीवीराची भूमिका बजावू शकतो. केएलने यापूर्वीही टीम इंडियासाठी सलामी दिली आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलला फिट ठेवणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे.
हेही वाचा-
WI VS ENG; वेस्ट इंडिजचा शानदार कमबॅक, इंग्लंडचा दारुण पराभव
IND vs AUS: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी का खेळू नये? पाहा मोठे कारण
IND vs AUS: रोहित-शुबमनशिवाय टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार? संघाचं नेतृत्व कोणाकडे?