---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा, २ नव्या खेळाडूंची निवड; पाहा संपूर्ण टीम

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 10:13 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये १ दिवस-रात्र, ३ एकदिवसीस सामन्यांची मालिका आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघ या सामन्यांसाठी २९ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. हे सर्व सामने सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये खेळले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी भारतीय कसोटी, एकदिवसीय आणि टी२० संघांची घोषणा केली आहे. या संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचे प्रतिनिधित्व मिताली राज करणार आहे. भारताच्या टी२० संघाचे नेतृत्वपद हरमनप्रीत कौर सांभाळणार आहे. मेघना सिंग आणि यस्तिका भाटिया यांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळणार आहे. डाव्या हाताची फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडचेही संघात पुनरागमन झाले आहे.

वेगवान गोलंदाज मेघना सिंगने रेल्वे संघासाठी एका सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या. तिच्या या प्रदर्शनानंतर तिला भारतीय टी२० संघात स्थान मिळाले आहे. तसेच डाव्या हाताची फलंदाज यस्तिका भाटियाने तिन्ही प्रकारांच्या संघात तिचे स्थान पक्के केले आहे.

भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा, पुनम राऊत, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, यस्तिका भाटिया, शिखा पांडे, झूलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष, एकता बिष्ट.

भारताचा टी२० संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, यस्तिका भाटिया, शिखा पांडे, मेघना सिंग, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष, हरलीन देओल, अरुंधति रेड्डी, राधा यादव, रेणुका सिंग ठाकुर.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शाहीन, १९ वर्षांचा आहे तो, बिचाऱ्याला डिवचू नकोस’; पाकिस्तानी यष्टीरक्षकाचा आफ्रिदीला मजेशीर सल्ला

कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

“आर अश्विन या आठवड्यातही खेळला नाही तर मला खूप आनंद होईल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---