पर्थ येथे झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं शानदार विजय नोंदवला. आता 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे, जी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. या सामन्यात भारतीय संघाकडे 2020 च्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2020-21 दौऱ्यात झालेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 36 धावांवर ऑलआऊट झाली होती, जो भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोर आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. बुमराहनं पहिल्या कसोटीत नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. त्यानं या सामन्यात आपल्या गोलंदाजीनंही कहर केला होता. बुमराहनं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
वास्तविक, जसप्रीत बुमराह 2024 मध्ये 50 कसोटी विकेटपासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यानं यावर्षी कसोटीमध्ये 49 विकेट घेतल्या आहे. दुसऱ्या सामन्यात बुमराहनं एक विकेट घेताच तो 2024 मध्ये 50 कसोटी विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनेल.
जसप्रीत बुमराहनं 2024 मध्ये आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले, ज्याच्या 20 डावात गोलंदाजी करताना त्यानं 49 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 15.24 आणि स्ट्राईक रेट 30 एवढा राहिला. 45 धावांत 6 विकेट ही त्याची एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या लिस्टमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 2024 मध्ये 46 कसोटी विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा –
अजिंक्य रहाणे होणार केकेआरचा पुढील कर्णधार? आयपीएल 2025 पूर्वी मोठं अपडेट जाणून घ्या
“भारतात जा आणि भारताला हरवून या”, पाकिस्तानी दिग्गजाची संघाकडे स्पेशल मागणी
भारतीय संघ अजूनही WTC फायनलमध्ये कसा पोहचू शकतो? न्यूझीलंडच्या पराभवामुळे सर्व समीकरणं बदलली