ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे. आज (22 नोव्होंबरपासून) बाॅर्डर गावस्कर मालिकेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमारह भारतीय संघाची कमान सांभळत आहे. यंदाच्या या कसोटी मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामधील पहिला सामना पर्थ येथे खेळवले जात आहे. सलामी कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच यजमान संघ पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे.
गेल्या दोन्ही मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला लोळवले आहे. पण यंदाच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया मागील पराभवाचे परतफेड करण्याच्या हेतूने मैदानात उतरले आहे. अश्या स्थितीत भारतसाठी हे काम सोप्पे असणार नाही. पण हे खडतर अव्हान आणि जबाबदारी स्वीकारण्यासाठी भारतीय संघ जसप्रीत बुमारह तयार असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास अष्टपैलू खेळाडू नितीशकुमारने आणि हर्षित राणाने डेब्यू केले आहे. तसेच फिरकीपटू म्हणून केवळ वाॅशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांना संघात समावेश करण्यात आले नाही.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड
भारत- केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज
हेही वाचा-
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी रवी शास्त्रींचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “पुजारा सारखा फलंदाज…”
हार्दिक पांड्या आता कसोटी क्रिकेट का खेळत नाही? शेवटचा कसोटी सामना कधी खेळला होता?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर लाइव्ह कुठे पाहायचा? भारतीय वेळेनुसार टॉस किती वाजता होईल?