टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. ऑस्ट्रेलियातील आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपला खराब फॉर्म सुधारण्याची आणि यश संपादन करण्याची क्षमता स्टार फलंदाज विराट कोहलीत आहे. असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. कोहली गेल्या काही महिन्यांपासून सर्व फॉरमॅटमध्ये वाईट टप्प्यातून जात आहे.
36 वर्षीय विराट कोहलीने या वर्षाच्या सुरुवातीपासून बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. तर त्याची सरासरी फक्त 21.33 आहे. पण शास्त्रींनी ऑस्ट्रेलियाला इशारा देत कोहली त्या देशात खेळेल, जिथे त्याला फलंदाजी आणि धावा करायला आवडते” असे म्हटले आहे.
कोहलीने ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केल्याने शास्त्रींनी मोठे विधान केले आहे. त्यांचे आकडे पुरावे म्हणून आहेत. शास्त्री यांनी ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये ऑस्ट्रेलियाला इशारा देताना म्हटले आहे की, ‘राजा (कोहली) आता जिथे तो चांगली कामगिरी करतो तिथे खेळेल. मी त्यांना एवढेच सांगेन.”
कोहली 2011-12 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी दौऱ्यावर गेला होता. पर्थमध्ये 44 आणि 75 धावांची खेळी खेळण्याबरोबरच त्याने ॲडलेडमध्येही लढाऊ शतक झळकावले. कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांमध्ये 692 धावा केल्या होत्या. 2018-19 च्या मालिकेत त्याने पर्थमध्ये 123 आणि मेलबर्नमध्ये 82 धावा केल्या. त्यानंतर त्याने संघाचे नेतृत्व केले. त्याच वेळी, कोहलीने 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक कसोटी खेळली आणि ॲडलेडमध्ये 74 धावा केल्या. एकंदरीत, कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 कसोटी सामन्यांमध्ये 48.26 च्या सरासरीने 1979 धावा केल्या आहेत. ज्यात 8 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा-
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारताची डोकेदुखी वाढली! स्टार फलंदाज दुखापती
“प्रत्येक विकेट तुम्हाला समर्पित…”, पुनरागमनानंतर मोहम्मद शमी भावूक, पहिली प्रतिक्रिया समोर
सेहवाग-रोहितपेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, हा कसोटी सामना शेवटचा