मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन आणि स्कॉट बोलंड यांनी भारताच्या विजयाला ‘ग्रहण’ लावलं. दिवसअखेरीस, बोलंड आणि लायन यांनी शेवटच्या विकेटसाठी 110 चेंडूत नाबाद 55 धांवांची भागीदारी करून संघाला 228/9 धावांपर्यंत पोहचवलं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बुमराहनं 4 आणि सिराजनं 3 विकेट घेतल्या. टीम इंडिया झटपट 9 विकेट घेण्यात यशस्वी ठरली. पण, बोलंड आणि लायनच्या भागीदारीनं भारताचा खेळ खराब केला.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. बुमराहनं 7व्या षटकात सॅम कॉन्स्टन्सला बाद करून टीम इंडियाचं खातं उघडले. पहिल्या डावात शानदार फलंदाजी करणारा कॉन्स्टन्स दुसऱ्या डावात 1 चौकाराच्या मदतीनं केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
चौथ्या दिवसाची सुरुवात भारताच्या दुसऱ्या डावानं झाली. तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियानं 358/9 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी क्रीजवर उपस्थित होते. भारतीय संघानं चौथ्या दिवशी पहिल्या डावात केवळ 11 धावा जोडल्या. संघाची 10वी विकेट नितेश रेड्डीच्या रूपानं पडली. नितीशनं 189 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 114 धावा केल्या. टीम इंडियानं पहिल्या डावात 369 धावा केल्या.
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय गोलंदाजांनी जास्त वेळ क्रीझवर टिकू दिलं नाही. टीम इंडियानं 173 धावांत ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट घेतल्या होत्या. येथून कांगारू संघ दुसऱ्या डावात 200 धावांचा टप्पाही पार करू शकणार नाही, असं वाटत होतं. पण, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांनी 10व्या विकेटसाठी नाबाद 55 धावांची भागीदारी केली आणि दिवसअखेर संघाला 228/9 धावांपर्यंत नेलं. यासह ऑस्ट्रेलियानं 333 धावांची आघाडी घेतली आहे.
हेही वाचा –
“मी सिलेक्टर असतो तर रोहितला नारळ दिला असता”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान यष्टिरक्षक फलंदाज जखमी, संपूर्ण मालिकेतून बाहेर
जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली