यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथी कसोटी संपली आहे. जो मेलबर्न क्रिकेट मैदानावर 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर असे पाच दिवस खेळला गेला. मेलबर्न कसोटी मालिकेत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा कसोटी सामना संपला असेल, पण मेलबर्न कसोटी आता वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालला वादग्रस्तपणे बाद केल्याने वादाला तोंड फुटले आहे. जयस्वाल 84 धावांवर फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा चेंडू लेग साईडवरून यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने झेलबाद केला. फील्ड अंपायर जोएल विल्सन यांनी ऑस्ट्रेलियाचे अपील फेटाळले. पण डीआरएसनंतर थर्ड अंपायर सैकत शराफेदौला यांनी जयस्वालला बाद घोषित केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
सैकत शराफेदौलाने स्निकोवर कोणतीही धार दिसत नसतानाही व्हिज्युअल डिफ्लेक्शनच्या आधारे निर्णय केले. यावर राजीव शुक्ला यांनी ट्विट केले की, “यशस्वी जयस्वाल स्पष्टपणे नाबाद होते. थर्ड अंपायरने तंत्रज्ञान काय सांगते हे ऐकायला हवे होते. फील्ड अंपायरचा निर्णय रद्द करण्यासाठी ठोस कारण असले पाहिजे.”
Yashaswi jayaswal was clearly not out. Third umpire should have taken note of what technology was suggesting. While over ruling field umpire third umpire should have solid reasons . @BCCI @ICC @ybj_19
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) December 30, 2024
महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही या निर्णयावर टीका केली होती. ते म्हणाले, “विक्षेपण हा ऑप्टिकल भ्रम असू शकतो. तंत्रज्ञान असेल तर ते वापरायला हवे. “फक्त दृश्य पुराव्याच्या आधारे निर्णय घेता येत नाही.”
हेही वाचा-
IND vs AUS: विराट कोहली-रोहित शर्मा निवृत्त होणार! माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा रेकाॅर्डची नोंद, सचिनलाही टाकले मागे
रोहित शर्मा, विराट कोहलीच्या भविष्याबद्दल माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य! म्हणाला…