भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. जे की हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी आहेत. नितीश कुमार रेड्डीने याआधी टीम इंडियासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. हे त्याचे कसोटी पदार्पण आहे. त्याला भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने पदार्पणाची कॅप दिली आहे. तर हर्षित राणा या कसोटीतून भारतसाठी पदार्पण करत आहे. त्याला रवी अश्विनने डेब्यू कॅप दिली.
ऑस्ट्रेलियन परिस्थितीत टीम इंडियाला वेगवान गोलंदाजांची गरज भासणार आहे. त्यामुळे हर्षित राणाचा समावेश करण्यात आले आहे. तर नितीश कुमार रेड्डी हा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कर्णधाराने त्याचा समावेश प्लेइंग 11 मध्ये केला आहे. नितीश कुमार रेड्डी यांच्यासाठी हा खूप खास क्षण होता. ऑस्ट्रेलियासारख्या कठीण परिस्थितीत भारतासाठी फार कमी खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
नितीश कुमार रेड्डीच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्याने 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 779 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 159 धावांची आहे. त्याचबरोबर त्याने चेंडूनेही चमत्कार दाखवले आहेत. नितीश रेड्डी यांनी 23 सामन्यांच्या 42 डावात 56 विकेट्स घेतल्या आहेत. चेंडूसह त्याची सरासरी 26.98 आहे. त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. कसोटीतहीAll Posts त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
Nitish Kumar Reddy’s idol is Virat Kohli & he received his debut Cap from his idol.
– A moment to remember for Nitish. ❤️ pic.twitter.com/p35v85nIju
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 22, 2024
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड
भारत- केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज
हेही वाचा-
IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी रवी शास्त्रींचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “पुजारा सारखा फलंदाज…”
हार्दिक पांड्या आता कसोटी क्रिकेट का खेळत नाही? शेवटचा कसोटी सामना कधी खेळला होता?