इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम संपन्न होताच भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला होता. कोरोना या साथीच्या आजारामुळे सर्व खबरदारी घेऊन भारतीय संघ खाजगी विमानाने ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मात्र, संघाचा खास सदस्य यादरम्यान ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नव्हता.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वीही भारतीय संघाचा थ्रोडाऊन विशेषज्ञ डी राघवेंद्र याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत तो भारतीय संघाशी जोडला जाईल अशीही चर्चा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही.
वेगवान गोलंदाजांविरुद्ध, भारतीय संघाच्या फलंदाजीत सुधारणा व्हावी यासाठी डी राघवेंद्र गेल्या दशकापासून नेटमध्ये घाम गळतोय. विराट कोहलीसमवेत अनेक दिग्गज फलंदाजाना त्याने नेटमध्ये गोलंदाजी केली आहे.
राघवेंद्र 9 नोव्हेंबरला विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. ऑस्ट्रेलियामध्ये आगमन होताच तो सिडनीतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये होता.
सिडनीत त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यामध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र काही दिवस क्वारंटाईनमध्ये घालवल्यानंतर त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या कारणामुळे त्याला पुन्हा 10 दिवस क्वारंटाईनमध्ये घालवावे लागले.
बऱ्याच दिवसंतानंतर गुरुवारी (3 डिसेंबर) रात्री डी राघवेंद्र मुक्तपणे वावरताना दिसला. शुक्रवारी रात्री ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरा येथे होणार्या टी-20 सामन्यानंतर तो पुन्हा भारतीय संघाशी जोडला गेला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने डी राघवेंद्रचे स्वागत केले आहे. तो एक खेळाडू नाही, तर जागतिक क्रिकेटमधील एक टूरिंग प्रॅक्टिशनर आहे. त्याच्यात ताशी 150 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.
राघवेंद्र हा भारतीय संघातील सहकारी कर्मचार्यांपैकी एक महत्वाचा सदस्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता..! ‘या’ गोलंदाजाने मोडला पॉन्टिंगचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, आता लक्ष्य एमएस धोनी
Video – केवळ खेळाडूच नाही तर प्रेक्षकांनीही घेतले भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत अफलातून झेल
ब्रेकिंग! वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर