भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा टी-20 सामना खेळण्यासाठी शुक्रवारी (01 डिसेंबर) मैदानात उतरला. रायपूरच्या शहीद वीर नारायन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. ऋतुराज गायकवाड या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये संयमी खेळी होता, पण जास्त काळ खेळपट्टीवर टिकला नाही. पण याचदरम्यान त्याने एकही भारतीयाला आतापर्यंत न जमलेली कामगिरी करून दाखवली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही टी-20 मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात आली. जयस्वालच्या (37) रुपात भारताने पहिली विकेट गमावल्यानंतर ऋतुराज काही काळ खेळपट्टीवर टिकला. पण वैयक्तिक 32 धावांचे योगदान दिल्यानंतर त्याने विकेट गमावली. त्याला ही खेळी अर्धशतकात बदलता आली नाही. पण यादरम्यान त्याने टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 4000 धावा करणाऱ्यांच्या यादीत ऋतुराजने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने या धावा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केल्या आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डिवांमध्ये 4000 धावा करणारे भारतीय फलंदाज
ऋतुराज गायकवाड – 116
केएल राहुल – 117
विराट कोहली – 138
सुरेश रैना – 143
रिषभ पंत – 147
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 4000 धावा करणारे फलंदाज (पुरुष)
107 – ख्रिस गेल
113 – शॉन मार्श
115 – बाबर आझम
116 – डेव्हॉन कॉनवे
116 – ऋतुराज गायकवाड
117 – केएल राहुल
(IND vs AUS. Opener Rituraj created history by showing a performance that no other Indian could match)
महत्वाच्या बातम्या –
फादर शॉच मेमोरियल आंतरशालेय हॉकी स्पर्धा 2023 । सेंट पॅट्रिक्स, लोयोला, पीसीएमसी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
ऑस्ट्रेलियाने जिंकली निर्णायक सामन्याची नाणेफेक! चार महत्वाच्या बदलांसह भारत करणार प्रथम…