भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ रविवारी (8 ऑक्टोबर) आमने सामने होते. विश्वचषक 2023 मधील हे दोन्ही संघांसाठी पहिलाच सामना असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्टीव स्मिथ याच्याकडून चाहत्यांना अर्धशतकाच्या अपेक्षा होत्या. पण त्याआधीच रविंद्र जडेजा याने त्याचा त्रिफळा उडवला.
स्टीव स्मिथ (Steve Smith) अर्धशतक करणार, असे वाटत असतानाच जडेजा गोलंदाजीला आला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 28 व्या षटकात अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पहिल्याच चेंडूवर स्मिथचा त्रिफळा उडवला. स्मिथने 71 चेंडूत 46 धावांची खेळी करून विकेट गमावली. जडेजाला या सामन्यात मिळालेली ही पहिली विकेट होती.
Smith had no answers to Jadeja.
– Ball of the World Cup 2023. pic.twitter.com/jlMrB3XJbH
— Johns. (@CricCrazyJohns) October 8, 2023
तत्पूर्वी भारतासाठी पहिली विकेट जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्श याची घेतली. त्यानंतर संघाला दुसरे यश कुलदीप यादवने मिळवून दिले. कुलदीपने सलामीवीर डेविड वॉर्नर याला 41 धावांवर तंबूत धाडले. (IND vs AUS Ravindra Jadeja Cleans up Steven Smith for 46)
https://www.instagram.com/reel/CyIrwGQPf-F/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड.
महत्वाच्या बातम्या –
तो पुन्हा आला! टीम इंडियाचा ‘सुपर फॅन’ जार्वोची चालू सामन्यात एन्ट्री, दोन वर्षांपूर्वी…
फक्त बॅटच नाही, फिल्डिंगमध्येही विराटच किंग! मोडून टाकला सचिन-कपिल देवचा ‘हा’ विक्रम