आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबद्दल चाहत्यांसह माजी खेळाडू देखील खूप उत्सुक आहेत. मालिका सुरू होण्यापूर्वीच माजी क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले आहे. मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंग आणि भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दोघांमध्ये बिनसलं आहे. दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पाँटिंग म्हणाला होता की कोहलीचा फॉर्म चिंताजनक आहे, कारण गेल्या पाच वर्षांत भारतीय फलंदाजाने केवळ दोन कसोटी शतके झळकावली आहेत. पण त्याला वाटते की कोहलीत फॉर्ममध्ये परत येण्याची क्षमता आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली जागा नाही. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली होती. त्यादरम्यान गंभीरला पाँटिंगच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले असता. त्याने अतिशय चोख उत्तर दिले.
गौतम गंभीरने पर्थला रवाना होण्यापूर्वी मीडियाला सांगितले की, ‘पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटते त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला विराट आणि रोहितची चिंता नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी खूपच निराशाजनक होती. कोहलीने 6 डावात केवळ 93 धावा केल्या तर रोहितने 91 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंगने 7 न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘विराटवर केलेल्या वक्तव्यावर त्याची प्रतिक्रिया पाहून मला आश्चर्य वाटले. तसेच प्रशिक्षक गौतम गंभीर खूपच चिडचिडा स्वभावाचा आहे. त्यामुळे मला त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटले नाही.
भारत 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. ज्यासाठी भारतीय संघ आधीच ऑस्ट्रेलियामध्यये पोहचला आहे.
हेही वाचा-
रोहित, विराट की धोनी, आयपीएल 2025 साठी तुमचा जोडीदार कोण? केएल राहुलचे मजेशीर उत्तर
“मला 100 टक्के खात्री भारत ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल”, माजी क्रिकेटपटूचा विश्वास
अभिषेक शर्माला डिच्चू, आवेश खानचा पत्ता कट; तिसऱ्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11