भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील चार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण यावेळी टीम इंडियाचा मार्ग सोपा नसेल. सुपरस्टार फलंदाज विराट कोहली फॉर्ममध्ये नसल्याने नावाप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. आता ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगने कोहलीचे समर्थन केले आहे.
विराट कोहलीला शेवटच्या सहा कसोटी डावांमध्ये केवळ 93 धावा करता आल्या. टीम इंडियाला त्याच्या खराब फॉर्मची किंमत न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावून चुकवावी लागली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आयसीसीशी बोलताना म्हणाला की, मी यापूर्वीही विराटबद्दल बोललो आहे. तुम्ही महान खेळाडूंकडे बोट दाखवू शकत नाही. तो एक महान क्रिकेटपटू आहे यात शंका नाही. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला आवडते. त्याचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. तो या मालिकेत सर्वकाही बदलू शकतो. पहिल्याच सामन्यापासून विराटने धावा करायला सुरुवात केली तर मला आश्चर्य वाटणार नाही.
तो पुढे म्हणाला की, आता असे दिसते की भारतीय फलंदाज पूर्वीप्रमाणे फिरकी खेळू शकत नाहीत. कदाचित आता भारतीय खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त आहेत. विराटने या वर्षाच्या सुरुवातीपासून सहा कसोटी सामन्यांमध्ये 22.72 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, जी 2011 मध्ये पदार्पण केल्यापासूनची त्याची सर्वात कमी सरासरी आहे. दहा वर्षांत प्रथमच तो आयसीसी कसोटी क्रमवारीतील टॉप 20 मधून बाहेर पडला आहे.
बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
हेही वाचा-
IND vs SA: दुसऱ्या टी20 साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल? या गोलंदाजाला पर्दापणाची संधी
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघाची घोषणा, पहिल्या कसोटीत या घातक खेळाडूला संधी
मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, अनेक जणांचा मृत्यू