नवोदित 19 वर्षीय सॅम कॉन्स्टास आपल्या पदार्पणाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना या पध्दतीने खेळेल, असे क्वचितच कोणीला वाटले असेल. त्याने ऑस्ट्रेलियासाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात 65 चेंडूत 60 धावांची खेळी केली. ज्यात त्याने जसप्रीत बुमराहला षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला. पण बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या सत्रातील सर्वात संस्मरणीय घटना म्हणजे विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्स आमनेसामने आले. वातावरण इतकं तापलं की अंपायरला हस्तक्षेप करायला पुढे यावं लागलं. आता आऊट झाल्यानंतर कॉन्स्टासने एका मुलाखतीत विराट कोहलीला आपला आवडता क्रिकेटर असल्याचे सांगितले आहे.
नक्कीच पदार्पणाच्या सामन्याने सॅम कॉन्स्टासला ऑस्ट्रेलियाचा मोठा स्टार बनवला आहे. 60 धावांची तुफानी इनिंग खेळल्यानंतर तो चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसला. एका ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने विराट कोहलीला आपला आवडता क्रिकेटर म्हणून वर्णन केले आणि सांगितले की कोहली जे काही करतो ते अविश्वसनीय आहे.
सॅम कॉन्स्टासला विचारण्यात आले की त्याचा आवडता क्रिकेटर कोण आहे. उत्तरात तो म्हणाला, “विराट कोहली, तो जे काही करतो ते अविश्वसनीय आहे.” विराट कोहलीने मैदानात त्याचे आक्रमकपणे स्वागत केले ही वेगळी बाब. मैदानावरील बाचाबाचीनंतर कॉन्स्टास म्हणाला, “हे सर्व क्रिकेटमध्ये घडत पण ते मैदनापर्यंतच असतं.”
जसप्रीत बुमराहपासून मोहम्मद सिराज आणि आकाशदीपपर्यंत सॅम कॉन्स्टन्ससमोर असहाय्य दिसत होते. त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले तोपर्यंत त्याने 5 चौकार आणि एक षटकार मारला होता. अखेर 20व्या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजी करायला आला आणि षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कॉन्स्टासचा झंझावाती डाव 60 धावांवर थांबला. त्याने उस्मान ख्वाजासोबत 89 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली.
हेही वाचा-
जसप्रीत बुमराहसमोर पाकिस्तानी वंशाच्या फलंदाजाची अवस्था खराब, 7 डावात 5व्यांदा बाद
IND vs AUS: रोहित शर्माने या फ्लॉप खेळाडूला प्लेइंग 11 मधून वगळले, घेतला धक्कादायक निर्णय
IND vs AUS: 19 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजाची आक्रमक खेळी, रचली विक्रमांची मालिका