ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिका 24 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान होणार आहे.
यातील 24 फेब्रुवारीला खेळला जाणारा पहिला टी20 सामना बंगळूरु येथे होणार होता. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे तो विशाखापट्टणममध्ये होणार आहे. तर विशाखापट्टणममध्ये 27 फेब्रुवारीला दुसरा टी20 सामना होणार होता. तो आता बंगळूरुमध्ये होणार आहे.
यावेळी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या मंजुरीनंतर सामन्यांच्या ठिकाणांमध्ये बदल केला आहे.
24 फेब्रुवारीला बंगळूरुमध्ये एरो इंडियाचा शो होणार आहे. याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहे. यामुळे बंगळूरुच्या पोलिस आयुक्तांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामन्याला सुरक्षा पुरविण्याबाबत असमर्थतता दर्शवली आहे. त्यामुळे टी20 मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा –
टी20 मालिका –
पहिला टी20 सामना – 24 फेब्रुवारी – विशाखापट्टणम – वेळ: संध्या. 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना – 27 फेब्रुवारी – बंगळुरू – वेळ: संध्या. 7.00 वाजता
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता
चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडचा द्विशतकवीर पाचव्या वन-डेला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
–एमएस धोनीला बाद केल्याशिवाय सामना जिंकणे कठीण, न्यूझीलंडच्या खेळाडूचे मोठे वक्तव्य
–सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाने जागतिक क्रमवारीतही घेतली मोठी झेप