भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला. याच कारणामुळे रोहित अद्याप ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला नाही. रोहित शर्माच्या ब्रेकवर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माने पर्थमध्ये भारतीय संघात सामील व्हावे. कारण सामना सुरू व्हायला अजून वेळ आहे. असे गांगुलीचे मत आहे.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्माने भारतीय संघात सामील व्हावे. अशी इच्छा आहे. रोहित शर्मा शुक्रवारी दुसऱ्यांदा पिता झाला. त्यांची पत्नी रितिकाने मुलाला जन्म दिला.
रोहित शर्माने बीसीसीआयला कळवले होते की पत्नीच्या प्रसूतीची तारीख जवळ असल्याने तो पहिल्या कसोटीत उपलब्ध होणार नाही. यामुळेच रोहित शर्मा इतर खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नाही. भारतीय संघ व्यवस्थापन रोहितला पर्याय शोधण्यात व्यस्त आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटीत संघात सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, भारताला त्याच्या नेतृत्वाची गरज असल्याने रोहित शर्माने तातडीने ऑस्ट्रेलियाला जावे. असे गांगुलीचे मत आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली.
या वेळी बोलताना तो म्हणाला, ‘मला आशा आहे की रोहित लवकर निघेल, कारण संघाला नेतृत्वाची गरज आहे. मी ऐकले की त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे, त्यामुळे मला खात्री आहे की तो लवकरच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. त्याच्या जागी मी असतो तर नक्कीच पहिली कसोटी खेळली असती. ही एक मोठी मालिका असून सामने सुरू होण्यास एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. तो एक हुशार कर्णधार आहे. भारताला नेतृत्वाची गरज आहे.
वास्तविक, शुभमन गिल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर असल्याचे वृत्त समोर आले आहे. केएल राहुलही कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. अशा स्थितीत भारतीय संघाची अव्वल फळी कमकुवत झाली आहे. रोहित शर्मा संघात सामील झाल्यामुळे नेतृत्व आणि टॉप ऑर्डरचा प्रश्न सुटणार आहे.
हेही वाचा-
IND VS AUS; ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायची असेल तर टीम इंडियाला करावे लागतील हे 4 बदल
26 चौकार, 205 धावा, लखनऊ सुपरजायंट्सच्या या खेळाडूची रणजी ट्रॉफीत द्विशतकी खेळी
बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीत या दोन गोलंदाजांमध्ये रंगणार विशेष लढत, अश्विनचा विक्रम धोक्यात