---Advertisement---

मोठी बातमी: टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये नाही जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर

On: बुधवार, जून 17, 2020 3:53 PM
---Advertisement---

कोविड-१९ या जागतिक महामरीमुळे क्रिकेट क्षेत्र गेल्या २-३ महिन्यांपासून ठप्प पडले आहे. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध होणाऱ्या टी२०, वनडे आणि कसोटी मालिकेंचे संपूर्ण नियोजन करुन ठेवले आहे. त्यांनी सामना, सामन्यांच्या दिनांक, ठिकाण सर्वकाही जाहीरदेखील केले आहे. पण, आता मोठी बातमी समोर येत आहे की, बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मोठे बदल करु शकते.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणार बदल

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार भारतीय संघ ११ ऑक्टोबरपासून ३ टी२० सामने खेळणार आहे. पण, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने असे संकेत दिले आहेत की, टी२० मालिकांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.

मीडियाने दिलेल्या वृत्तात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “जर टी२० विश्वचषक कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आले. तर, भारतीय क्रिकेट बोर्ड आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलू शकते. कसोटी आणि वनडे मालिका झाल्यानंतरही टी२० मालिका घेतली जाऊ शकते.”

टी२० मालिकेतील बदल

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी२० सामना ब्रिसबेन येथे ११ ऑक्टोबरला होणार आहे. दूसरा सामना कॅनबेरा येथे १४ ऑक्टोबरला आणि तिसरा सामना ऍडलेड येथे १७ ऑक्टोबरला होणार आहे. परंतु, बीसीसीआय अधिकाऱ्याच्या विधानानुसार कदाचित भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही.

कसोटी मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना ब्रिसबेन येथे ३ डिसेंबरला होणार आहे. दूसरा सामना ऍडलेड येथे ११ डिसेंबरला तर तिसरा सामना मेलबर्न येथे २६ डिसेंबरला होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे ३ जानेवारीला होणार आहे.

वनडे मालिका

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार वनडे मालिकेची सुरुवात १२ जानेवारीला पर्थ येथे होणार आहे. दुसरा सामना मेलबर्नमध्ये १५ जानेवारीला तर तिसरा सामना सिडनीमध्ये १७ जानेवारीला होणार आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

कोवि़ड-१९ दरम्यान आयपीएल झाल्यास बनू शकतो खूप मोठा विक्रम!

‘मी आशा करतो की चीनी सुधारतील’; विरेंद्र सेहवाग भडकला

‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---