सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) बीसीसीआयने सूर्यकुमार यादव याला भारतीय टी20 संघाचा कर्णधार घोषित करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सूर्यकुमार ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या अनुपस्थितीत सूर्यावर युवा संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेचा भाग राहिलेले 3 खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. त्यात सूर्यासह प्रसिद्ध कृष्णा आणि इशान किशन यांचा समावेश आहे. अशात पहिल्या सामन्यापूर्वी सूर्याने माध्यमांशी बोलताना जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. चला तर, तो काय म्हणाला, जाणून घेऊयात…
कुठे खेळला जाणार पहिला सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी भारत आपल्या अभियानाची सुरुवात करेल.
काय म्हणाला सूर्या?
पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला की, “टी20 विश्वचषक लक्षात घेता, जे सामने आपण खेळणार आहोत, ते खूपच महत्त्वाचे आहेत. मी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, निर्भीड होऊन खेळा आणि ते सर्व करा, ज्याने संघाला मदत होईल. त्यांनी आयपीएलमध्ये केले आहे आणि घरगुती क्रिकेटही खूप खेळले आहेत. ”
Suryakumar Yadav said, "I've told the guys to be very selfless, I'm not the guy who likes personal milestones. I always tell to keep the team first". pic.twitter.com/JByp6ddLOL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 23, 2023
पुढे बोलताना सूर्या म्हणाला की, “ते चांगले फॉर्ममध्ये आहेत, याविषयी मी सपोर्ट स्टाफमध्ये ऐकले आहे. मी त्यांना एकच सांगितले आहे की, मैदानात जाऊन मजा घ्या, तेच करा, वेगळे काही करू नका. शेवटी हा क्रिकेटचा एक सामना आहे.”
आधी ऋतुराज, नंतर श्रेयस उपकर्णधार
मालिकेतील सुरुवातीच्या 3 सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड उपकर्णधाराची भूमिका निभावेल. तसेच, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर रायपूर आणि बंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात संघाशी जोडला जाईल. तो या दोन सामन्यासाठी उपकर्णधार अशेल. भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण या मालिकेसाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार) , ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार. (ind vs aus t20i series captain suryakumar yadav asks team india to play fearless cricket against australia)
हेही वाचा-
आयपीएल ऑक्शनपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सकडून प्रमुख दोन खेळाडू रिलीज, मोठे कारण आले समोर
WC Final: मोहम्मद कैफचा वॉर्नरने घेतला समाचार, नको ते बोलणं पडलं भलतंच महागात; म्हणाला, ‘याला फायनल…’