---Advertisement---

IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या तीन बदलांसह भारतीय संघ मैदानात

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 9:04 AM
BGT 1st Test toss
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील यंदाच्या बाॅर्डर गावस्कर मालिकेला टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिल्या कसोटीत यजमान संघाचा 295 धावांनी पराभव केला होता. ज्यामुळे टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या पिंक बाॅल कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्माचे आगमन झाले आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

बाॅर्डर गावस्कर मालिकेतील हा दुसरा सामना ॲडलेड येथील ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. जो की दिवस रात्र कसोटी सामना आहे.  तसेच हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. रोहित शर्मा, शुबमन गिल, आर अश्विन यांचा संघात समावेश झाला आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

भारत– यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड

हेही वाचा-

ख्रिस गेल किंवा मॅक्सवेल नाही तर या फलंदाजाच्या नावावर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकाराची नोंद
“या गोष्टींकडे फारसे…”, यशस्वी जयस्वालने केलेल्या स्लेजिंग वर मिचेल स्टार्कची प्रतिक्रिया समोर
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---