---Advertisement---

कसं व्हायचं याचं! सोप्पा झेल सोडल्यानंतर पृथ्वी शॉ सोशल मिडीयावर होतोय ट्रोल

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 5:57 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध जोरदार आक्रमण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज अडखळत खेळताना दिसून आले. परंतु ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्यूशाने याने भारतीय गोलंदाजांना सतवले. लॅब्यूशानेला त्याच्या डावात तीन वेळा जीवदान मिळाले.

त्यापैकी एक झेल खुप सोपा होता. तो झेल पृथ्वी शाॅने सोडला. जसप्रीत बुमराहाच्या गोलंदाजीवर पृथ्वी शाॅने झेल सोडला, त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पृथ्वीसाठी हा सामना कोणत्या वाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेला नाही. तो पहिल्या दिवशीच खाते न उघडता बाद झाला होता. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण करताना त्याने लॅब्यूशाने सारख्या फलंदाजाचा सोपा झेल सोडला. त्यावेळी लॅब्यूशाने २१ धावांवर खेळत होता. बुमराहच्या गोलंदाजीवर लॅब्यूशाने फटका खेळताना टायमिंग करू शकला नव्हता आणि चेंडू हवेत उडाला होता, तेव्हा स्क्वेअर लेगवर उभा असलेल्या पृथ्वी शॉने लॅब्यूशानेचा झेल सोडला. हा सोप्पा झेल देखील पृथ्वीने सोडल्यामुळे सोशल मिडीयावर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.

 

पृथ्वीने हा झेल सोडला असला तरी भारतीय संघाला हे फार महागात पडले नाही. लॅब्यूशाने त्यानंतर ४७ धावा काढून माघारी परतला. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात ५३ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली आहे.

संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
उडता कोहली! भारतीय कर्णधाराने डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, व्हिडिओ जोरदार व्हायरल
– ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजाचा साधारण झेल बुमराहकडून मिस, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---