भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वेगवेगळ्या संघांची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणऱ्या टी-20 मालिकेत अपेक्षेप्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात आली असून यामध्ये रमणदीप सिंग, विजयकुमार विशाख आणि यश दयाल यांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर बॉर्डर-गावस्कर ट्रा्ॅफीसाठी निवडण्यात आलेल्या संघातील नव्या चेहऱ्यांमध्ये अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांच्या नावांचा समावेश आहे.
डब्ल्यूटीसी फायनलसाठी ऑस्ट्रेलिया दौराही खूप महत्त्वाचा असणार आहे. असे वाटत होते की कदाचित या मालिकेत काही अनुभवी खेळाडूंना संधी मिळेल. जे काही काळ टीम इंडियाच्या बाहेर आहेत आणि पुनरागमन करण्याची ही त्यांच्यासाठी शेवटची संधी असू शकते. पण बीसीसीआयने त्याच्याकडे दुर्लक्ष करत, त्याची कारकीर्द आता संपली आहे, असे कुठेतरी सूचित केले. या बातमीद्वारे आपण अशा 3 खेळाडूंबाबत बोलणार आहोत.
3. ईशांत शर्मा
झहीर खानच्या निवृत्तीनंतर, भारतीय संघासाठी अनेक वर्षे कसोटी वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा लीडर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ईशांत शर्माला 2021 नंतर वगळण्यात आले. यानंतर त्याला दुसरी संधी मिळाली नाही. इशांतने अद्याप निवृत्ती घेतलेली नाही पण आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली नाही. यावरून निवडकर्त्यांनी आता त्याच्यापासून पुढे सरकल्याचे स्पष्ट होते.
2. अजिंक्य रहाणे
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने टीम इंडियाची कमान सांभाळली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मात्र, त्यानंतर रहाणेची कामगिरी काही विशेष झाली नाही. फलंदाजी करताना तो फ्लॉप होत राहिला. याच कारणामुळे त्याला संघातूनही वगळण्यात आले होते. अनुभवी फलंदाज अजूनही देशांतर्गत क्रिकेट खेळत असून त्याने काही चांगल्या खेळी खेळल्या पण निवडकर्त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
1. चेतेश्वर पुजारा
बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीपूर्वी संघात निवड होण्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार द्विशतक झळकावून आपली दावेदारी मांडली होती. पण त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मागील दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांवर भारतीय संघाच्या मालिका विजयात पुजाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याचा अनुभव आणि अलीकडचा फॉर्म पाहता त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळेल. अशी आशा होती पण तसे झाले नाही.
हेही वाचा-
मयंक यादवसह या खेळाडूंना टी20 संघात स्थान नाही, बीसीसीआयने सांगितले मोठे कारण
IND vs NZ: टीम इंडिया अडचणीत, पुणे कसोटीसह मालिका गमावण्याचा धोका?
IND vs NZ: भारताला लाज वाचवायची असेल तर 16 वर्षांच्या या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल