भारताचा 19 वर्षांखालील संघ रविवारी आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला. अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान होते. विजयासाठी भारताला 254 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारतीय फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्याने सामना हातातून निसटला. भारताने 43.5 षटकांमध्ये 174 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला.
भारतीय संघाने 19 वर्षांखालील या वनडे विश्वचषकात एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. पण अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. 254 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या भारताचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. सलामीवीर अर्शिन कुलकर्णी अवघ्या 3 धावा करून बाद झाला. भारताला अंतिम सामन्यात मिळालेला हा पहिला झटका ठरला. सलामीवीर आदर्श सिंग याने 77 चेंडूत 47 धावांची खेळी केली, तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मुरुगण अभिषेक 46 चेंडूत 42 धावा करून बाद झाला.
मुशीर खान 22, कर्णधार उदय सहारन 8, सचिन धस 9, प्रियांशू मोलिया 9, यष्टीरक्षक फलंदाज अरावेली अवनीश 0, राज लिंबानी 0, धावा करून बाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी राफ मॅकमिलन आणि महली बियर्डमन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 253 धावा केल्या होत्या. यात हरजन सिंग यायने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. कर्णधार ह्यू वेबगेन याने 48, सलामीवीर हॅरी डिक्सन 42 आणि ऑलिव्हर पीक याने 46* धावांचे योगदान दिले. सलामीवीर सॅम कॉन्स्टास शुन्यावर बाद झाला. यष्टीरक्षक फलंदाज रायन हिक्स 20, राफ मॅकमिलन 2, तर टॉम स्ट्रेकर याने 13 धावांची खेळी केली.
भारतासाठी गोलंदाजी विभागात राज रिंबानी याने 10 षटकांच्या कोट्यात 38 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. नमन तिवारी याने 9 षटकात 63 धावा खर्च केल्या, पण दोन विकेट्स देखील नावावर केल्या. सौम्य पांडे आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (IND vs AUS u19 WC Final Australia🇦🇺 are the champions of ICC Under-19 Cricket World Cup 2024)
अंतिम फेरीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ
भारतीय संघ :-आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया संघ :- ऑस्ट्रेलिया: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), ऑलिव्हर पीक, चार्ली अँडरसन, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर.
महत्वाच्या बातम्या –
कहानी अभी बाकी है! उमेश यादवने नाही सोडल्या कसोटी खेळण्याच्या आशा, इस्टा स्टोरी चर्चेत
Rajkot Test । पुजारा संघाला घरी बोलावणार? अश्विनने बोलून दाखवली मनातील इच्छा