आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला धक्का बसला आहे. त्याच्या मोठ्या भावाला मंगळवारी (4डिसेंबर) ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी आतंकवादी हल्ल्याप्रकरणी अटक केली. या गोष्टीमुळे चिंतीत असलेल्या उस्मानने त्याला सध्या त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
अर्सलन ख्वाजा असे उस्मानच्या भावाचे नाव असून त्याला आतंकवादी हल्ल्याची सुची बनवल्याबद्दल सिडनीमध्ये अटक करण्यात आली. त्या यादीतील अक्षर हे त्याचे नसल्याने निष्पन्न झाले असून अर्सलनला जामिनावर सोडण्यात आले आहे.
“ऑगस्टमध्ये न्यू साऊथ वेल्स विश्वविद्यालयात मिळालेल्या पुराव्यावरून अर्सलनला अटक केली होती. त्यामध्ये आतंकवादी हल्ल्याची माहिती होती”, असे न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी सांगितले.
अटक केल्यावर अर्सलनला पॅरामाटा येथील स्थानिक कोर्टमध्ये नेण्यात आले. जामिनावर सोडण्याआधी त्याला अनेक नियम सांगण्यात आले. तसेच त्याचा पासपोर्टही जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले.
मुळचा पाकिस्तानचा असलेल्या उस्मानने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 35 कसोटी सामन्यात 43.83च्या सरासरीने 2455 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात चार कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरला अॅडलेड येथे खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोलाचा सल्ला…
–मिताली राजच्या अडचणीत वाढ; कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधनाने केला मोठा खूलासा
–ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीला हा खास विक्रम करण्याची संधी