नुकतेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत टीम इंडियाला 1-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाच्या पराभवामागे विराट कोहली आणि रोहित शर्माचा खराब फॉर्म हे प्रमुख कारण होते. या दोघांनी मालिकेत काही विशेष कामगिरी केली नाही. टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या सहकाऱ्यांनी त्याला एक खास सल्ला दिला आहे. विराट कोहलीने फॉर्ममध्ये येण्यासाठी काय करावे हे त्याने सांगितले आहे. याशिवाय कोहलीने मैदानावरील वादांपासून दूर राहावे, असेही त्याने म्हटले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून एबी डिव्हिलियर्स आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी सहकारी विराट कोहलीला त्याच्या खराब फॉर्मवर मात करण्यासाठी आपले मन ‘रीसेट’ करण्याचा आणि मैदानावरील कोणतेही वाद टाळण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धावा काढण्यासाठी संघर्ष केला. कोहलीने या मालिकेत नऊ डावांमध्ये केवळ 190 धावा केल्या आणि अनेकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो बाद झाला. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. ज्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला. या मालिकेतील भारतीय संघाचा हा एकमेव विजय ठरला. ज्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने ‘एक्स’वर लिहिले की, मला वाटते की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मन पुन्हा सेट करणे. विराटला अनेकदा आव्हानांना सामोरे जाणे आवडते, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममध्ये असता तेव्हा या गोष्टींपासून दूर राहणे चांगले. एक फलंदाज म्हणून स्वत:ला नव्या पद्धतीने तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक चेंडूला महत्त्व असते, मग गोलंदाज कोणीही असो. यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली अनेकवेळा ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि तिथल्या चाहत्यांशी भांडताना दिसला.
हेही वाचा-
टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर, या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा
रणजी ट्राॅफी न खेळण्यासाठी कारणे देवू नयेत, संघातील वरिष्ठ खेळाडूंना गावसकरांनी सुनावले
विराटसारख्या वरिष्ठ खेळाडूची जागा भारतीय संघात असावी का? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य