सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज (7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
आत्तापर्यंत 71 वर्षांत 29 आशियाई कर्णधार ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील फक्त विराट कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे. तरीही कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे.
अॅडलेड आणि मेलबर्न कसोटी जिंकल्यावर भारताला सिडनी कसोटी सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. यामुळे कोहली नाराज झाला आहे.
“मालिका जिंकल्याने आम्ही खूष आहोत. पण आम्हाला ही मालिका 3-1 अशी जिंकायची होती”, असे कोहली सिडनी कसोटी सामना संपल्यावर म्हणाला.
चौथ्या दिवशी सिडनी कसोटीमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला होता. तर आजही (7 जानेवारी) पावसामुळे पाचव्या दिवसात एकही षटक टाकता आले नाही. यामुळे पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला.
ही मालिका जिंकल्यावर कोहलीने हा विजय संपूर्ण संघाचाच आहे, असे म्हणत गोलंदाजांचेही कौतुक केले.
या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे चेतेश्वर पुजाराला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या मालिकेत 3 शतके आणि एक अर्धशतकाच्या मदतीने 521 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–२८ आशियाई कर्णधारांना न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली
–तिकडे भारताने मालिका जिंकली, इकडे वसीम जाफरने मनं जिंकली
–२९८५ दिवसांनी तो महान क्रिकेटर करतोय वनडेत कमबॅक
–रिकी पॉटींगचे टीम इंडियाबद्दलचे ३ अंदाज चुकले