fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रिकी पॉटींगचे टीम इंडियाबद्दलचे ३ अंदाज चुकले

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.

याबरोबरच पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन भूमीत जिंकण्याचा इतिहास रचला आहे.

ही मालिका सुरू होण्यापूर्वीच दोन्ही देशाच्या आजी-माजी खेळाडूंनी त्यांचे अंदाज लावले होते. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पॉटींगनेही त्याचे तीन अंदाज लावले होते. जे पूर्णपणे चुकीचे ठरले आहे.

यामध्ये पॉटींगने उस्मान ख्वाजा भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षा अधिक धावा करेल असे म्हटले होते. तर या मालिकेत कोहलीने 282 धावा केल्या आणि ख्वाजाने 198 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया ही मालिका 2-1 अशी जिंकेल असेही पॉटींग म्हणाला होता. मात्र झाले विरुद्धच भारताने ही चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

तसेच मेलबर्न कसोटीमध्ये चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवरही पॉटींगने टीका केली होती. या सामन्यात त्याने 319 चेंडूमध्ये 106 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 137 धावांनी जिंकला होता.

त्याचप्रमाणे पुजाराने या मालिकेत 521 धावा केल्या आहेत. या मालिकेत त्याने 3 शतके आणि एक अर्धशतक केले असून त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

२९८५ दिवसांनी तो महान क्रिकेटर करतोय वनडेत कमबॅक

…आणि चेतेश्वर पुजाराला नाचावे लागले, पहा व्हिडिओ

या दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार…

You might also like