fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार…

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.

या मालिकेचा मालिकावीर पुरस्कार चेतेश्वर पुजाराला देण्यात आला आहे. याबरोबरच तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीमध्ये मालिकावीर पुरस्कार मिळवणारा एकूण पाचवाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

याआधी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार के. श्रीकांत, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना मिळाला आहे.

पुजाराने या मालिकेत 4 सामन्यात 1258 चेंडू खेळताना 521 धावा केल्या आहेत. यात त्याने तब्बल 1868 मिनिटे फलंदाजी केली आहे. या मालिकेत पुजाराने 3 शतके आणि एक अर्धशतक केले आहे.

विशेष म्हणजे पुजाराचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिलाच मालिकावीर पुरस्कार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत मालिकावीर पुरस्कार मिळवणारे भारतीय खेळाडू – 

1985-86 – के श्रीकांत

1985-86 – कपिल देव

1999-00 – सचिन तेंडुलकर

2003-04 – राहुल द्रविड

2018-19 – चेतेश्वर पुजारा

महत्त्वाच्या बातम्या-

२८ आशियाई कर्णधारांना न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली

कोहलीची टीम इंडिया असा भीमपराक्रम करणारा बनला जगातील पाचवाच संघ

आयपीएलमध्ये जागा न मिळालेल्या खेळाडूचा शतकातील सर्वोत्तम झेल घेण्याचा प्रयत्न, पहा व्हिडिओ

You might also like