पर्थ। आज(18 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध 146 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी लाभदायक होती असे सामन्याच्या आधी म्हटले जात होते. झालेही तसेच मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन हा सामनावीर ठरला. त्याने या सामन्यात आठ विकेट्स घेतले आहे.
मात्र या सामन्यात भारतीय संघाला पूर्णवेळ फिरकी गोलंदाज संघात नसल्याचा फटका बसला. कारण भारताने चार वेगवान गोलंदाज आणि कामचलावू फिरकी गोलंदाज हनुमा विहारी यांना पर्थ कसोटीसाठी अंतिम 11 जणांच्या संघात संधी दिली होती. तसेच रविंद्र जडेजाचा फिरकी गोलंदाज म्हणून पर्याय खूला असतानाही त्याला संधी देण्यात आली नाही.
या स्टेडीयमवरील खेळपट्टी ही जून्या पर्थ स्टेडीयम सारखीच आहे. त्यामुळे या खेळपट्टीवरील गवतामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार होती. त्यामुळे विराटने या सामन्यात इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या चार गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्या कसोटीनंतर त्याचा हा निर्णय चुकला असल्याचे त्याला कळून चुकले आहे.
“मी जेव्हा खेळपट्टी बघितली तेव्हा आम्ही रविंद्र जडेजाचा विचारच केला नव्हता. आम्हाला वाटले या खेळपट्टीवर फक्त चार वेगवान गोलंदाज पुरेसे असतील”, असे कोहली म्हणाला.
” ऑस्ट्रेलियाचा संघ उत्तम खेळला. भारतीय संघाने सांघिक कामगिरी केली. या सामन्यात जरी त्याचा फायदा झाला नसला तरी पुढील सामन्यासाठी आम्हाला सांघिक कामगिरीचा उपयोग होईल”, असेही कोहली म्हणाला
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल ३५ वर्षांनंतर टीम इंडियावर आली अशी वेळ
–किंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग
–कोहली-पेन वाद हा खिलाडूवृत्तीला धरूनच – जोश हेजलवूड