भारतीय फलंदाज विराट कोहलीने रविवारी (24 नोव्हेंबर) रोजी कसोटी क्रिकेटमधील 16 डावांनंतर शतकाचा दुष्काळ संपवला आहे. यावेळीही त्याने मोठी खेळी खेळण्यासाठी मोठा सामना निवडला. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात जबरदस्त खेळी खेळली. विराटने कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक झळकावले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रमही मोडला. ऑस्ट्रेलियात सात शतके झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिनने ऑस्ट्रेलियात 6 कसोटी शतके झळकावली होती.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात केवळ 5 धावा करता आल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात त्याने शानदार फलंदाजी केली. त्याच्यासाठी मंच यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी तयार केला होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावा जोडल्या होत्या. विराटने डाव पुढे नेत दमदार शतक झळकावले. विराटने 143 चेंडूत 8 चौकार 2 षटकारांच्या मदतीने आपले 30 वे कसोटी शतक पूर्ण केले. याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याचे कसोटी सामन्यात शतक झाले होते. ज्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. आता एक वर्ष, 4 महिने आणि 3 दिवसांनी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले.
Century by @imVkohli and in comes the declaration from Captain Bumrah.#TeamIndia lead by 533 runs.
Scorecard – https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND pic.twitter.com/sdJYZWMQ9Z
— BCCI (@BCCI) November 24, 2024
विराट कोहलीने शतक झळकावताच, भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. भारताने 487/6 वर डाव घोषित केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य आहे. कारण पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 46 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 104 धावांवर गडगडली होती.
हेही वाचा-
विराट कोहलीचा जबरदस्त षटकार! सुरक्षा रक्षकाला लागला चेंडू; व्हायरल VIDEO पाहा
IPL 2025 mega auction; या 10 विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोटींची रक्कम, पाहा यादीत कोणाचा समावेश
रोहित संघात परतल्यास कोण ड्रॉप होणार? राहुल पुन्हा बनणार का बळीचा बकरा?