भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 मध्ये सुरुवातीपासून मागे पडला तो शेवटपर्यंत. वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. जसप्रीत बुमराह याने सुरुवातीच्या विकेट्स मिळवून दिल्या. पण नंतर त्यालाही विकेट मिळाली नाही. सामना आपल्या हातून निसटत चालल्याचे समजू लागल्यानंतर बुमराह निराश झाल्याचे लाईव्ह सामन्यात पाहायला मिळाले.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला नाणेफेक जिंकता आली नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथन फलंदाजी करताना भारताने 240 धावांपर्यंत जमल मारली. प्रत्युत्तारत ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या नुकसानावर 241 धावांचे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वाधिक दोन विकेट्स घेऊ शकला. पण मधल्या षटकांमध्ये बुमराहला देखील विकेट मिळाली नाही.
मिचेल मार्श (15) आणि स्टीव स्मिथ (4) या दोन महत्वाच्या विकेट्स गेतल्या. सामन्यातील आपली तिसरी विकेट त्याला मिळाली नाही. विकेट मिळत नसल्यामुळे बुमराह चांगलाच नाराज झाला होता. याच कारणास्तव त्याने खेळपट्टीवरून जात असताना राग काढला. हातातील कॅप त्याने स्टंप्सच्या बेल्सवर मारली, ज्यामुळे बेल्स खाली पडल्या. नंतर खाली पडलेली बेल्स बुमराहने स्वतः उचलली आणि पुन्हा स्टंप्सवर मांडली.
???? Jasprit Bumrah knocks bail with his cap.#CWC23 #JaspritBumrah #INDvsAUS #Ahmedabad #INDvAUS #CWC23Final#TravisHead#CongratulationsIndia #INDvsAUSFinal #CongratulationsAustralia #Umpires #Pressure #Bumrah pic.twitter.com/xZcFwbGeov
— Leo (@iamleo8225) November 19, 2023
Every time panauti umpire richard kettleborough umpires call
Bumrah show the froustation#IndiaVsAustralia #INDvsAUSfinal #RohithSharma #Shreyas #gill #ViratKholi #SuryakumarYadav #siraj pic.twitter.com/6qWxPlCM8e— SAURABH RAWAT (@kr_btech31433) November 19, 2023
दरम्यान, भारतीय संघाला या सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे सर्वांचीच निराशा झाली. स्पर्धेत सलग 10 विजय मिळवल्यानंतर भारताने अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा भारतासाठी बाधा ठरला. याआधी 2003 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने सामने होते आणि भारतीय संघाला पराभव मिळाला होता. रोहित शर्मा याच्याकडे भारताचा तिसरा विश्वचषक जिंकणारा कर्णधार होण्याची संधी होती, पण रविवारी त्याने ही संधी गमावली. (IND vs AUS World Cup final Jasprit Bumrah knocks bail with his cap.)
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड (World Cup 2023 IND vs AUS final Toss See playing XI Here)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच वनडे क्रिकेटची बादशाह! World Cup Final मध्ये टीम इंडिया पराभूत, हेडचे ऐतिहासिक शतक
CWC 2023 मध्ये भारतीय गोलंदाजांनी घडवला इतिहास! रोहितसेनेकडून ऑस्ट्रेलियाचा 16 वर्षे जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त