जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23 ऑस्ट्रेलियान संघाच्या नावावर राहिली. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 209 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच डब्ल्यूटीसीच गदा उंचावली. याविजयासह ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्वा ट्रॉफी जिंकणारा केवळ पहिलाच संघ ठरला आहे. दुसरीकडे भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ अद्याप संपला नाहीये. मागच्या 10 वर्षांमध्ये ही आठवी आयसीसी स्पर्धा आहे, ज्यामध्ये भारतीय संघ विजेतेपदापासून थोडक्यात हुकला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. हा अंतिम सामना बुधवारी (7 जून) इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर सुरू झाला. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाला आमंत्रित केले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षठकांमध्ये 469 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 296 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 8 बाद 270 धावा करून भारताला फलंदाजीची संधी दिली. विजयासाठी भारतापुढे 444 धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते, जे संघ गाढू शकला नाही. भारतीय संघ शेवटच्या डावात 234 धावा करून सर्वाबाद झाला.
एमएस धोनीच्या नेतृत्वात 2013 साली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, जी भारताची शेवटची आयसीसी ट्रॉफी आहे. त्यानंतर मागच्या जवळपास 10 वर्षांपासून भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीये. यादरम्यान संघाने एकूण 9 आयसीसी स्पर्धा खेळल्या. पण एकातही विजेतेपद मिळवले नाही.
मागच्या सलग 9 आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचे प्रदर्शन
2014 टी-20 विश्वचषक – अंतिम सामना
2015 वनडे विश्वचषक – उपांत्य सामना
2016 टी-20 विश्वचषक – उपांत्य सामना
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी – अंतिम सामना
2019 वनडे विश्वचषक – उपांत्य सामना
2021 जागतिक कसोटी अजिंक्यपद – अंतिम सामना
2021 टी-20 विश्वचषक – ग्रुप स्टेज
2022 टी-20 विश्वचषक – उपांत्य सामना
2023 जागतिक कसोटी अजिंक्यपद – अंतिम सामना
(The wait continues for Indian fans, 10 years since the last ICC Trophy.)य
महत्वाच्या बातम्या –
अनुष्काने ओव्हलवर येऊन केली चूक! विराटची विकेट पडताच अभिनेत्री जोरात ट्रोल
रहाणेची विकेट पडताच भारतीय क्रिकेटप्रेमींचा हार्टब्रेक! ‘हा’ विश्वविक्रम करण्याचा मानही गमावला