बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वालची मैदानावर अत्यंत खराब कामगिरी होती. ज्याचा परिणाम या सामन्याच्या निकालावर स्पष्टपणे दिसून येईल अशी अपेक्षा आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टीम इंडिया पहिल्या डावात 369 धावा करून ऑलआऊट झाली होती. यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पहिला झटका लवकर बसू शकला असता पण क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वी जयस्वाल स्लिपमध्ये उस्मान ख्वाजाचा सोपा झेल सोडला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या फक्त 7 धावा होती. त्यावेळी ख्वाजा 2 धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर ख्वाजाने एकूण 21 धावांची खेळी खेळली.
उस्मान ख्वाजाचा झेल सोडल्यानंतर यशस्वी जयस्वाल अधिक सावधपणे क्षेत्ररक्षण करेल अशी सर्व चाहत्यांना अपेक्षा होती. पण तसे होताना दिसले नाही. ज्यात त्याने पुन्हा मार्नस लॅबुशेनचा झेल सोडला. अशा वेळी ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 99-6 अशी होती. यानंतर कांगारू संघाला पुनरागमन करण्याची पूर्ण संधी मिळाली. लॅबुशेनचा झेल यशस्वीने गलीमध्ये सोडला जो खूप सोपा होता आणि त्यावेळी तो 46 च्या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करत होता. त्यानंतर तो 70 धावांची इनिंग करण्यात यशस्वी झाला. याशिवाय यशस्वी जयस्वालने 21 धावांवर वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सचाही झेल सोडला. त्यावेळी जयस्वाल सिली पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यात चेंडू येण्यापूर्वीच तो उठला आणि झेल त्याच्या पायांमधून गेला.
एकीकडे मेलबर्नच्या मैदानावर चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर पूर्ण दबाव कायम ठेवला होता. तर दुसरीकडे यशस्वीच्या खराब क्षेत्ररक्षणावर कर्णधार रोहित आणि विराट कोहली या दोघांचाही राग पाहायला मिळाला. यशस्वीने महत्त्वाच्या वेळी लॅबुशेनचा झेल सोडला तेव्हा कोहलीही त्याच्यासोबत स्लिपमध्ये होता. तो रागात दिसत होता. जयस्वालने कमिन्सचा सिली पॉईंटवर झेल सोडला. तेव्हा कर्णधार रोहित बराच वेळ त्याच्याकडे बघत राहिला.
हेही वाचा-
डी गुकेशनंतर भारताला मिळाला नवा वर्ल्ड चॅम्पियन, 37 वर्षीय महिला खेळाडूने रचला इतिहास
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान यष्टिरक्षक फलंदाज जखमी, संपूर्ण मालिकेतून बाहेर
कसोटीत सर्वात जलद 200 बळी घेणारे 3 भारतीय गोलंदाज