बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये यशस्वी जयस्वाल आतापर्यंत चांगलाच चर्चेत राहिला आहे. मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. फलंदाजीत शानदार कामगिरी करणारा जयस्वाल आता स्लेडिंगच्या करताना दिसत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टसची स्लेजिंग केली. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
आत्तापर्यंत सॅम कॉन्स्टास या मालिकेत अनेक भारतीय खेळाडूंसोबत शाब्दिक वादावादीत गुंतला आहे. कॉन्स्टासची पहिल्यांंदा विराट कोहलीसोबत मेलबर्न कसोटीत बाचाबाची झाला होती. या प्रकरणाने बरेच लक्ष वेधले होते. त्यानंतर कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला.
यानंतर, सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कॉन्स्टसचे भारतीय वेगवान गोलंदाज आणि सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह यांच्यात शाब्दिक वाद झाले. आता दुसऱ्या दिवशी जयस्वाल ऑस्ट्रेलियन सलामीवीराची स्लेजिंग करताना दिसला. सिडनी कसोटीत सॅम कॉन्स्टन्स पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी फार काही करू शकला नाही. त्याने 38 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कॉन्स्टंट्स फलंदाजीसाठी क्रीजवर उपस्थित होता. या दरम्यान, जयस्वाल म्हणाला, “आता काय झाले, शॉट्स दिसत नाहीये का? ओये कोंटूस, शॉट्स दिसत नाहीये का?” पाहा व्हिडिओ-
THE BANTER OF JAISWAL vs KONSTAS…!!! 😄👌 pic.twitter.com/nQ4RBrkiTT
— Johns. (@CricCrazyJohns) January 4, 2025
पहिल्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियन संघ 181 धावांवर सर्वबाद झाला. संघाकडून पदार्पण करणाऱ्या वेबस्टरने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 5 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. यादरम्यान भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णाने 3-3 विकेट घेतल्या. बुमराह आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हेही वाचा-
बिग ब्रेकिंगः जसप्रीत बुमराहने चालू सामन्यातच स्टेडियम सोडले, पाहा कारण…
‘तुला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला का?’, वैतागलेला रोहित म्हणाला….
आजची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, रोहित शर्मा क्रिकेटमधून…