न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकामध्ये ‘मालिकावीर’ ठरल्यानंतर शुबमन गिल हा युवा क्रिकेटर प्रकाशझोतात आला. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतनंतर शुबमनला आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले होते. पंजाबच्या फाजिल्का येथे जन्मलेल्या या क्रिकेटरने 2019 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केले. आता त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसर्या वनडे सामन्यात त्याला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे या सामन्यातील काही फोटो शुबमनने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केले. मात्र, या फोटोंवर युवराज सिंगने त्याला चांगलेच ट्रोल केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सुरुवातीला दोन सामने पराभूत झाल्यावर त्याला तिसर्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. कॅनबेरा येथील मनुका ओव्हल या मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात मयंक अग्रवालच्या जागी खेळण्याची त्याला तिसर्या वनडेत संधी मिळाली. या सामन्याच्या विजयानंतर शुबमनने संघातील खेळाडूंसोबतचे फोटो शेअर केले होते. त्याचे हे फोटो त्याला झालेला आनंद व्यक्त करत होते.
यापैकी एका फोटोत तो विराट सोबत फलंदाजी करत आहे, दुसर्या एका फोटोत तो पदार्पण करणाऱ्या नटराजनसोबत निवांत उभा असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करताना शुबमनने लिहिले की, ‘देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा हा महान क्षण.’
यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने शुबमन गिलच्या एका फोटोवर त्याला ट्रोल केले. युवराजने प्रतिक्रिया देताना त्याने क्लब सामन्यात आणि भारतीय संघात खेळतानाचा फरक सांगितला. युवराज शुबमनच्या फोटोवर टिप्पणी करत म्हणाला, “निश्चितच विराट सोबत फलंदाजी करताना आनंद झाला असेल, परंतु महाराज खिशातून हात काढा. भारताचा सामना चालू आहे क्लबचा सामना नाही.”
तिसर्या वनडे सामन्यात शुबमनने 39 चेंडूत 33 धावांची खेळी केली. यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 84.62 चा होता. मात्र, तो ऍश्टन एगरच्या चेंडूवर स्विप करण्याच्या नादात बाद झाला. तीन सामन्याची वनडे मालिका 2-1 या फरकाने भारताने गमावली.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता..! ‘या’ गोलंदाजाने मोडला पॉन्टिंगचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, आता लक्ष्य एमएस धोनी
ब्रेकिंग! वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण
एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा
ट्रेंडिंग लेख-
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर