---Advertisement---

विराटला बेसबॉलच्या रूपात पाहिलंय का? मेजर बेसबॉल लीगने केला मजेशीर फोटो शेअर

On: मंगळवार, डिसेंबर 8, 2020 2:18 PM
---Advertisement---

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १९९२च्या विश्वचषकात वापरण्यात आलेल्या रेट्रो जर्सीमध्ये खेळत आहे. भारताची ही रेट्रो जर्सी क्रिकेट रसिकांच्या देखील पसंतीस उतरली आहे. अनेक क्रिकेट रसिकांनी व माजी खेळाडूंनी सोशल मीडियाद्वारे या जर्सीचे कौतुक देखील केले होते. याच जर्सीमध्ये विराट कोहलीला बेसबॉल खेळाडूच्या रुपात दाखवत मेजर बेसबॉल लीगने आपल्या फेसबुक पेजवरून गमतीशीर फोटो पोस्ट केला आहे.

विराटला बेसबॉल खेळाडूच्या रुपात बघून क्रिकेट रसिकांना देखील सुखद धक्का बसला आहे. काही कालावधीतच हा फोटो फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

विराट या फोटोमध्ये बेसबॉल खेळासाठी आवश्यक साहित्य घालून तसेच हातात बेसबॉल बॅट घेवून उभा आहे. एकूणच विराट या फोटोत हुबेहूब बेसबॉल खेळाडू सारखाच दिसत आहे. फोटो शेअर करत मेजर बेसबॉल लीगने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे, ‘तुम्ही विराटच्या या फोटोला १० पैकी किती गुण द्याल? यावर चाहत्यांनी देखील अनेक मजेशीर उत्तरे दिली आहेत.

https://twitter.com/man4_cricket/status/1335886713499971586

https://twitter.com/Manoj__negi/status/1336140522436534272

https://twitter.com/Abhishe44284150/status/1335962342970937349

https://twitter.com/Suman_rout18/status/1335934410231697410

दरम्यान विराट सध्या भारतीय संघाच्या आगामी सामन्यासाठी तयारी करत आहे. भारताचा ऑस्ट्रोलिया विरुद्धचा मालिकेतील शेवटचा टी२० सामना ८ जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट मैदानात खेळला जात आहे. या पूर्वी झालेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर- गावस्कर’ मालिका सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने

रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ

भारत- ऑस्ट्रेलिया सराव सामना: दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब, पुजारा शून्यावर बाद, तर रहाणे…

ट्रेंडिंग लेख-

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---