भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार (27 सप्टेंबरपासून) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही.
कानपूर येथे काल झालेल्या पावसामुळे मैदान ओला असल्यामुळे टॉसला उशीर झाला. कानपूर कसोटीत भारताची सुरुवात चांगली झाली आहे. डावाच्या सुरुवातीपासूनच झाकीर हुसेन भारतीय गोलंदाजीसमोर संघर्ष करताना पाहायला मिळाले. शेवटी आकाश दीपने यशस्वी जयस्वालच्या हस्ते त्याला तंबूत पाठवले. यशस्वीने शानदार झेल पकडून सर्वांना चकित केले. हुसेन 24 धावांचा सामना करुन 0 धावावर बाद झाला
AKASH DEEP STRIKES…!!! 🔥
– Jaiswal with a stunner. pic.twitter.com/g5yiyzJ4hq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
आकाशदीपने डावाच्या 12 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शादमान इस्लामला बाद करत संघाला दुसरे विकेट मिळवून दिले. आकाशदीपने इस्लामला पायचीत केले. इस्लामने 36 चेंडूत 24 धावा केल्या. ज्यामध्ये 4 चाैकारांचा सामवेश आहे. ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पाहुण्यांचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडियाची नजर असेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 280 धावांनी पराभव केला. दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाचे लक्ष जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले नंबर-1 स्थान आणखी मजबूत करण्यासाठी असेल.
तिसऱ्या आणि चाैथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या मोमिनुल आणि कर्णधार शांतो यांनी संघाला सावरत लंचब्रेकपर्यंत 78 चेंडूत 45 धावांची नाबाद म्हत्त्वपूर्ण भागिदारी केली. ज्यामध्ये शांतो (28) तर मोमिनुल (17) धावांवर खेळत आहेत. लंचब्रेकपर्यंत बांग्लादेश 26 षटकात 74-2 अश्या स्थितीत आहे. भारताकडून गोलंदाजीत केवळ आकाशदीपला दोन विकेट्स मिळवण्यात यश मिळाले.
हेही वाचा-
शिखर धवनची संथ फलंदाजी; संघाचा दारुण पराभव, माजी आरसीबी खेळाडूची शानदार खेळी
ग्राऊंड स्टाफही विराट कोहलीचे जबरे फॅन! मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ व्हायरल
संघाचा मोठा निर्णय! ड्वेन ब्राव्हो घेणार गौतम गंभीरची जागा…