बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेवर पाणी सोडावे लागले होते. मात्र, त्यानंतर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत पहिला कसोटी सामना नावावर केला. आता बांगलादेश विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. उभय संघातील या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 314 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. तसेच, दुसऱ्या डावात 82 धावांची आघाडीही घेतली.
यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेश (Bangladesh) संघाने दिवसाच्या सुरुवातीला नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. मात्र, नंतर लिटन दास (Litton Das) याने डाव सांभाळला. लिटनला या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याच्यामुळे दोन वेळा जीवदान मिळाले.
विराट कोहलीने सोडला झेल
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. तो अजूनही खूपच फिट आहे आणि शानदार झेल घेतो. त्यामुळे त्याल नेहमीच स्लीपमध्ये उभे केले जाते. मात्र, बांगलादेशच्या दुसऱ्या डावादरम्यान असे काहीतरी पाहायला मिळाले, ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.
Virat Kohli dropped 4th catch in slip😳.. What's happening??!
— Sai (@SaiSankarRao15) December 24, 2022
Virat Kohli catching's so bad today, if he went and hugged everyone in Wuhan hospital's pandemic ward, he won't even catch Covid. #BANvIND
— Binoy (@ThisisBinoy) December 24, 2022
https://twitter.com/TuAurMaiChutyia/status/1606623972401217536
Virat Kohli is dropping catches in Slip. He dropped 4 of it today. #ViratKohli #Kohli #BANvsIND #INDvsBAN
Courtesy: SONY SPORTS pic.twitter.com/XKbad9n7MI
— Zee 24Tas (@zee24tasin) December 24, 2022
नेमकं काय झालं?
झालं असं की, अक्षर पटेल याने 44व्या षटकातील दुसरा चेंडू लिटन दास याला चेंडू टाकला, तेव्हा फलंदाजाच्या बॅटची कड घेत चेंडू थेट स्लीपमध्ये गेला. तिथे विराट उभा होता. मात्र, तो योग्य वेळी झेप घेऊ शकला नाही आणि चेंडू निसटला. तसेच, षटकाच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा बॅटची कड घेत चेंडू स्लीपमध्ये गेला. मात्र, इथेही विराटने योग्य वेळी पुढे झेप घेतले नाही आणि चेंडू त्याच्या बोटांना लागून खाली पडला. अशाप्रकारे लिटन दास याला दोन वेळा जीवदान मिळाले. याचा पुरेपूर फायदाही त्याने घेतला. लिटन दास याने दुसऱ्या डावात 73 धावा चोपल्या. त्यामुळे भारतापुढे बांगलादेश संघाने 145 धावांचे आव्हान ठेवले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 45 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. खेळपट्टीवर अक्षर पटेल (26) आणि जयदेव उनाडकट (3) आहेत. भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर पुढील दोन दिवसात 100 धावा पार करायच्या आहेत. (ind vs ban 2nd test cricketer virat kohli drops catch of litton das two times in axar patel over see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एवढे पैसे मिळणार म्हणून थरथर कापत होता अष्टपैलू, सांगितला आयपीएल लिलावाचा अनुभव
धोनीच्या सीएसकेने केला अपमान; आता भिडूने लिलावात साडेचार कोटी घेत रचला इतिहास