IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, भारतीय संघ आणि त्याच्या चाहत्यांसाठी कानपूरमधून चांगली बातमी समोर येत नाहीये. पुढील काही दिवसांत कानपूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होणार नाही. असे सांगण्यात येत आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास बांग्लादेशपेक्षा भारताचे नुकसान जास्त आहे. कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पराभवाला सामोरे जावे लागणार असून, सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळण्याच्या टीम इंडियाच्या आशांनाही मोठा धक्का बसू शकतो.
कानपूर हवामान अहवाल
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवली जाणार असून ती 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. Accuweather च्या अहवालानुसार, सामन्याच्या पहिल्या तीन दिवसात पावसाची शक्यता जास्त आहे. 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये पावसाची शक्यता सर्वाधिक 93 टक्के आहे. तर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता अनुक्रमे 80 आणि 59 टक्के आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस पावसामुळे वाहून गेले. तर उरलेल्या दोन दिवसांत सामन्याचा निकाल मिळणे कठीण होईल. तर याचा WTC पॉइंट टेबलवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया
सध्याच्या WTC पॉइंट टेबलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सर्वाधिक 71.67 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर बांग्लादेश 39.29 टक्के गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांमध्ये 4-4 गुणांचे वितरण केले जाईल. या स्थितीत भारताच्या खात्यात केवळ 68.18 टक्के गुण शिल्लक राहतील. घरची परिस्थिती आणि दोन्ही संघांचा विचार करता कानपूर कसोटीत भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे. जर भारताने दुसरी कसोटी जिंकली तर खात्यात 74.24 टक्के गुण होतील.
त्यामुळे पावसामुळे कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यास भारताचे नुकसान होणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी भारताला आणखी 9 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी टीम इंडियाला किमान 5 सामने जिंकावे लागतील. बांग्लादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया येथे खेळायची आहे. बांग्लादेशविरुद्ध फेव्हरिट समजल्या जाणाऱ्या टीम इंडियाची दुसरी कसोटी पावसामुळे वाहून गेली. तर भारताचा पुढचा प्रवास कठीण होईल.
हेही वाचा-
कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत शून्यावर बाद होणारे दिग्गज; भारताच्या ‘या’ खेळाडूंचा समावेश
IND vs BAN: कोहलीच्या फाॅर्मने वाढवले भारताचे टेंशन, सरावादरम्यान कित्येक वेळा बाद
निवृत्तीबद्दल शिखर धवनचा मोठा खुलासा, म्हणाला, “गेल्या दोन वर्षांत…”