भारत विरुद्ध बांग्लादेश टी20 मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली होती. आतापर्यंत भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे. भारताने याआधीच मालिका जिंकली असल्याने, शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. एकीकडे नितीश दुसऱ्या सामन्यात 74 धावांची इनिंग खेळून भारताचा नवा स्टार बनला आहे. तर दुसरीकडे मयंकनेही दोन्ही सामन्यात चांगल्या लाईन-लेन्थवर गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या 2 खेळाडूंना संधी मिळू शकते हे जाणून घेऊया.
मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी या मालिकेत समाधानकारक कामगिरी केली असून आता पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हर्षित राणाचेही नाव जोडले जाऊ शकते. हर्षितसाठी मागील हंगाम खूप चांगला होता.ज्यामध्ये त्याने केकेआरकडून खेळताना 13 सामन्यात 19 विकेट घेतल्या होत्या. याआधी त्याचा झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. हर्षितला संधी मिळाल्यास मुख्य गोलंदाजांपैकी एकाला तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते.
तिलक वर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत 16 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 336 धावा आहेत. तो 33.6 च्या चांगल्या सरासरीने फलंदाजी करत असून त्याने आतापर्यंत 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. मात्र, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. पण त्याने टी20 सामन्यांमध्ये समाधानकारक कामगिरी केली आहे. त्याला संधी दिल्यास मधल्या फळीतील एका खेळाडूला बाहेर व्हावे लागेल.
भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, हर्षित राणा
हेही वाचा-
Hardik Pandya Birthday : एकेकाळी 200 रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हार्दिक, आज आहे एवढ्या कोटींची संपत्ती!
पाकिस्तानचा दिग्गज वकार युनूसने निवडली ऑल टाईम इलेव्हन, फक्त एका भारतीयाला दिलं स्थान
‘रूटला त्रास देणारा एकच गोलंदाज आहे, तो म्हणजचे भारतीय…’ इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिकिया..