भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0ने विजय मिळवला. यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, आता या दौऱ्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडेबाबत आहे. याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ पुढील आठवड्यात बांगलादेश दौऱ्यावर रवाना होईल. भारतीय संघाचा 2015नंतर हा पहिलाच बांगलादेश दौरा आहे. भारतीय संघ 4 डिसेंबरपासून ढाका येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यातून वनडे मालिकेची सुरुवात करेल. दोन्ही संघांमध्ये दुसरा सामनाही ढाका येथेच 7 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. यानंतर तिसरा सामना 10 डिसेंबर रोजी ढाका येथेच होणार होता, पण आता या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा निर्णय सामन्यादिवशी ढाका येथे होणाऱ्या आंदोलनाचा धोका लक्षात ठेवून घेतला आहे. सामन्याचे स्थळ बदलल्याने मालिका सुरळीतपणे सुरू राहण्याची परवानगी मिळेल. कारण, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (BNP) सामन्याच्या दिवशीच रॅलीची घोषणा केली आहे, ज्यामुळे ढाक्याच्या रस्त्यावर शेकडो लोक येतील असे बोलले जात आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालन प्रमुख जलाल युनूस यांनी बुधवारी (दि. 23 नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “मुळात चितगाव कसोटीचे आयोजन करणार आहे. या ठिकाणी वनडे सामना व्हावा, असे आम्हाला वाटले.” यावेळी त्यांनी विरोधकांचे आंदोलन टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी बदल करण्यात आला होता का, यावर भाष्य करण्यास नकार दिला.
बांगलादेश आणि भारत संघातील वनडे मालिकेनंतर पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबरदरम्यान ढाका येथे आणि दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबरदरम्यान चितगाव येथे खेळला जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. आता ते बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करतील. (ind vs ban 3rd odi bangladesh move india odi from dhaka due to protest threat read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीवर आली भांडी घासण्याची वेळ, फोटो होतोय भलताच व्हायरल
जरा इकडे पाहा! भारताला विश्वविजेता बनवणाऱ्या खेळाडूची बीपीएलमध्ये एन्ट्री; म्हणाला, ‘जगातली भारी स्पर्धा’